AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ulhasnagar | पंचम कलानींसह 9 नगरसेविकांना क्रॉस वोटिंग प्रकरणात दिलासा, भाजपला धक्का

याचिकेवरील सुनावणीत कोकण विभागीय आयुक्तांनी तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे भाजपची याचिकाच फेटाळून लावली. त्यामुळे कलानी समर्थक 9 नगरसेविकांना जीवनदान मिळालं आहे.

Ulhasnagar | पंचम कलानींसह 9 नगरसेविकांना क्रॉस वोटिंग प्रकरणात दिलासा, भाजपला धक्का
टीम कलानीतील नगरसेविकांचा जल्लोष
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 3:08 PM
Share

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या टीम ओमी कलानीच्या 9 नगरसेवकांना जीवनदान मिळालं आहे. कारण महापौर निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याप्रकरणी भाजपने या नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी केलेली याचिका कोकण विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावली आहे.

काय आहे प्रकरण?

उल्हासनगर महापालिकेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत टीम ओमी कलानीचे 22 नगरसेवक भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवून विजयी झाले होते. या नगरसेवकांनी पहिली अडीच वर्ष भाजपला समर्थन दिलं, तर अडीच वर्षांनी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत यापैकी 9 नगरसेवकांनी भाजपचा व्हीप झुगारत शिवसेनेला मतदान केलं, ज्यामुळे उल्हासनगर महापालिकेत सत्तांतर होऊन शिवसेनेच्या लीलाबाई आशान या महापौर झाल्या.

कोकण विभागीय आयुक्तांकडे भाजपची याचिका

यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी यांनी या 9 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई व्हावी, अशी याचिका कोकण विभागीय आयुक्तांकडे दाखल केली. या याचिकेवरील सुनावणीत कोकण विभागीय आयुक्तांनी तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे याचिकाच फेटाळून लावली. त्यामुळे कलानी समर्थक 9 नगरसेवकांना जीवनदान मिळालं आहे.

कोण आहेत 9 नगरसेविका

पप्पू कलानी यांची सून आणि उल्हासनगरच्या माजी महापौर पंचम ओमी कलानी यांच्यासह डिंपल ठाकूर, दीपा पंजाबी, शुभांगिनी निकम, छाया चक्रवर्ती, रेखा ठाकूर, आशा बिऱ्हाडे, कविता गायकवाड आणि जयश्री पाटील अशी या 9 नगरसेविकांची नावं आहेत. या नगरसेविकांना जीवनदान मिळाल्यानंतर शुक्रवारी पप्पू कलानी यांचं निवासस्थान असलेल्या ‘कलानी महल’वर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत

दरम्यान, याच नगरसेविकांच्या नातेवाईकांनी काही दिवसांपूर्वीच अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तर पंचम कलानी यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा महापालिका आयुक्तांकडे सोपवत मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. उर्वरित 8 नगरसेविकांनी पक्षांतर बंदी कायद्यामुळे अजूनही राष्ट्रवादीत थेट प्रवेश केलेला नाही. मात्र अपात्रतेची कारवाई टळल्यामुळे भविष्यात हे नगरसेवक राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू शकणार असून त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद मात्र वाढली आहे.

संबंधित बातम्या :

उल्हासनगरात राजकीय भूकंप, पप्पू कलानींच्या सुनेसह 22 नगरसेवकांच्या हाती ‘घड्याळ’

राष्ट्रवादीत प्रवेश न करणाऱ्या नगरसेवकांची नावंही यादीत, टीम ओमी कलानीवर नामुष्की

उल्हासनगरात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, कलानी परिवाराच्या हाती सत्तेचा रिमोट कंट्रोल

Follow Us
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?