AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उल्हासनगरात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, कलानी परिवाराच्या हाती सत्तेचा रिमोट कंट्रोल

राष्ट्रवादी, म्हणजेच कलानी परिवारानेही भविष्याचा विचार करत शिवसेनेच्या प्रस्तावाला होकार दिला आहे. दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांची नुकतीच एक प्राथमिक बैठक झाली, ज्यात आगामी 2022 सालच्या महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेण्यात आला

उल्हासनगरात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, कलानी परिवाराच्या हाती सत्तेचा रिमोट कंट्रोल
NCP SHIVSENA
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 3:09 PM
Share

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेची आगामी निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय शिवसेना आणि राष्ट्रवादीने घेतला आहे. कलानी परिवाराच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर उल्हासनगरात राष्ट्रवादीची ताकद वाढली असून त्यामुळे शिवसेनेने निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याची चर्चा यानंतर उल्हासनगरात आहे.

शिवसेनेचं राष्ट्रवादीला आवताण

उल्हासनगर शहराचे माजी आमदार पप्पू कलानी हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर उल्हासनगर शहरातली राजकीय गणितं मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. आधी भाजपसोबत असलेल्या कलानी गटानं पप्पू कलानी हे जेलबाहेर येताच तब्बल 32 नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यातच पप्पू कलानी यांनी वैयक्तिक भेटीगाठी घेत सध्या उल्हासनगर शहर अक्षरशः पिंजून काढलं आहे. त्यामुळे सध्याचं वातावरण पाहता उल्हासनगर महापालिकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता येईल, अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र या सगळ्यानं महापालिकेत सध्या सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या गोटात काहीसं असुरक्षित वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळं शिवसेनेनं एक पाऊल पुढे टाकत राष्ट्रवादीला निवडणुकीपूर्वीच एकत्र येण्याचं आवाहन केलं.

बैठकीत एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब

राष्ट्रवादी, म्हणजेच कलानी परिवारानेही भविष्याचा विचार करत त्याला होकार दिला आहे. दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांची नुकतीच एक प्राथमिक बैठक झाली, ज्यात आगामी 2022 सालच्या महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला शिवसेनेकडून शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, माजी सभागृह नेते धनंजय बोडारे, नगरसेवक अरुण आशान तर राष्ट्रवादीकडून पप्पू कलानी यांचे सुपुत्र ओमी कलानी, माजी महापौर पंचम कलानी, माजी नगरसेवक मनोज लासी उपस्थित होते. या बैठकीत एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं, तर बाकी गोष्टी पुढच्या बैठकीत ठरवल्या जाणार आहेत.

बॅकफूटवर जाण्याच्या भीतीनं शिवसेनेचा पुढाकार?

या सगळ्याबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांना विचारलं असता, राज्यातील महाविकास आघाडीप्रमाणे आम्ही स्थानिक पातळीवरही एकत्र येण्याचा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले. तसंच राष्ट्रवादीची वाढती ताकद पाहता शिवसेनेनं बॅकफूटवर जाण्याच्या भीतीनं एकत्र येण्यासाठी पुढाकार घेतला का? असा प्रश्न त्यांना विचारला असता, पप्पू कलानी जेलबाहेर आल्यानं राष्ट्रवादीची ताकद वाढली असेल, मात्र शिवसेनेला त्याचा काही फरक पडत नसून यापूर्वीही पप्पू कलानी शहरात असताना आम्ही निवडणुका लढवल्या आहेत, मागील निवडणुकीत तर भाजपनं सत्तेचा दुरुपयोग करून निवडणुका लढवल्या, तरीही शिवसेनाच सर्वात मोठा पक्ष ठरला, असं त्यांनी स्पष्ट केलं. तर महापौरपदाबाबत विचारलं असता, ज्याचे जास्त नगरसेवक येतील त्याचाच महापौर होईल, असं म्हणत भविष्यात आमचे वरिष्ठ जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असंही राजेंद्र चौधरी म्हणाले.

एकत्र लढलो, तर दोन्ही पक्षांचा फायदाच – ओमी कलानी

या सगळ्याबाबत राष्ट्रवादीत गेलेल्या कलानी परिवाराचे सदस्य आणि पप्पू कलानी यांचे सुपुत्र ओमी कलानी यांना विचारलं असता, आम्ही एकत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय वरिष्ठ पातळीवरून झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच एकत्र लढलो, तर दोन्ही पक्षांचा फायदाच होईल, असं त्यांनी सांगितलं.

काँग्रेसची भूमिका अस्पष्ट

या दोन पक्षांच्या आघाडीत महाविकास आघाडीचा तिसरा घटकपक्ष असलेला काँग्रेस मात्र अद्याप सहभागी झालेला नाही. काँग्रेसनं याआधीच ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्यानं आम्ही त्यांना विचारात घेतलं नसल्याचं शिवसेना आणि राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. मात्र काँग्रेसला उल्हासनगरात आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, तर महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवण्याशिवाय पर्याय नाही, अशीच स्थानिक पातळीवरची परिस्थिती आहे.

दुसरीकडे आधीच कलानी परिवाराच्या राष्ट्रवादी प्रवेशाने कमकुवत बनलेली भाजप येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीसमोर कितपत तग धरू शकेल, हे मात्र सांगता येणं कठीण आहे. मात्र काहीही असलं, तरी उल्हासनगर शहराचं राजकारण येत्या निवडणुकीत ‘कलानी’ नावाभोवतीच फिरणार, हे मात्र स्पष्ट आहे. त्यामुळं उल्हासनगरात निवडणुकीपूर्वीच शिवसेनेनं केलेली आघाडी, हे एकाअर्थी शहाणपणच म्हणावं लागेल.

संबंधित बातम्या :

‘त्यांना जितकं पळायचंय तितकं पळू द्या’, ओमी कलानी यांचं थेट भाजपला आव्हान, उल्हासनगरच्या राजकीय घडामोडींना वेग

उल्हासनगरात राजकीय भूकंप, पप्पू कलानींच्या सुनेसह 22 नगरसेवकांच्या हाती ‘घड्याळ’

राष्ट्रवादीत प्रवेश न करणाऱ्या नगरसेवकांची नावंही यादीत, टीम ओमी कलानीवर नामुष्की

Follow Us
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष