AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri Chinchwad Dahi Handi Death : दहीहंडीची कमान अंगावर पडली अन्…; पिंपरी चिंचवडमध्ये दुर्घटना कशी घडली, सलमा यांच्या मृत्यूचं कारण समोर

Pimpri Chinchwad Dahi Handi : दहीहंडीचा उत्साह सुरू असतानाच पिंपरी चिंचवडमधील जुन्या सांगवीत दुर्दैवी घटना घडली. दहीहंडी संपल्यानंतर लोखंडी सांगाडा काढत असताना त्याचा भाग ४५ वर्षीय सलमा सलाउद्दीन पठाण यांच्या डोक्यावर कोसळला.

Pimpri Chinchwad Dahi Handi Death : दहीहंडीची कमान अंगावर पडली अन्...; पिंपरी चिंचवडमध्ये दुर्घटना कशी घडली, सलमा यांच्या मृत्यूचं कारण समोर
Pimpri Chinchwad Dahi Handi DeathImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 05, 2026 | 4:24 PM
Share

आज 5 सप्टेंबर राज्यासह देशात सर्वत्र दहीहंडी सोहळा उत्साहात सुरु आहे. परंतू सोबत विविध ठिकाणी अनेक गोविंदा जखमीही होण्याच्या घटनाही घडत आहेत. आता पिंपरी चिंचवडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. याठिकाणी एका महिलेचा दुर्देवीरित्या मृत्यू झाला आहे. ही घटना नेमकी कशी झाली याचा तपशील आता समोर आली आहे. सदर घटनेचा CCTV व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या घटनेनंतर गोविंदापथकाचा सदस्य असलेल्या मृत महिलेच्या मुलानं याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, ही घटना पिंपरी चिंचवडच्या जुन्या सांगवीतील दहीहंडी उत्सवासात घडली आहे. दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर पडून ४५ वर्षीय सलमा सलाउद्दीन पठाण या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नेमकी कशी घडली घटना?

रात्री विघ्नहर्ता या मंडळाची दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत होती. सर्वकाही सुरळीत पार पडले. परंतू हंडी संपल्यानंतर लोखंडी सांगाडा काढण्याचं काम सुरू झालं होतं आणि नेमकं याचवेळी अचानक लोखंडी भाग सलमा यांच्या डोक्यावर कोसळला. हा सर्व प्रकार रात्री दहा वाजेच्या सुमारास घडला. कोणाला काही कळण्यापूर्वीच अवघ्या पाच मिनिटांच्या आतच या ही घटना घडून गेली. दरम्यान सलमा या सर्व प्रकारानंतर प्रचंड जखमी झाल्या. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे त्यांना तपासण्यात आल्यानंतर मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यामुळे मंडळावर दुःखाचा डोंगर कोसळला शिवाय उत्सवाला गालबोटही लागलं.

दरम्यान आता या सर्व दुःखद प्रकारानंतर मृत महिलेच्या मुलाने मंडळाविरोधात पोलिस तक्रारीस विरोध केला आहे. कारण की मृत महिलेचा मुलगा मंडळात असल्याने कुटुंबीयांनी ठरवून नकार दिला आहे. इतर मुलं अडचणीत येऊ नयेत, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली असून पोलिसांनीदेखील स्वतःहून गुन्हा दाखल करू नये, अशीही विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेनं जुन्या सांगवी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Follow Us
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथक...
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथकांना मोठं आवाहन