AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Teachers Day 2026 : क्लासरूम ते स्टारडम.. सेलिब्रिटी बनण्यापूर्वी शिक्षक होते हे कलाकार, कोण कोण यादीत ?

शिक्षक दिन दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो, जो आपल्या आयुष्यात गुरुंचे महत्त्व अधोरेखित करतो. या दिवशी आपण त्यांना प्रेम आणि आदर व्यक्त करतो. अभिनयाच्या दुनियेत येण्यापूर्वी अनेक लोकप्रिय बॉलिवूड कलाकारांनी शिक्षक म्हणून काम केलं.

Teachers Day 2026 : क्लासरूम ते स्टारडम.. सेलिब्रिटी बनण्यापूर्वी शिक्षक होते हे कलाकार,  कोण कोण यादीत ?
Bollywood Celebrites and teachers
| Updated on: Sep 05, 2026 | 4:26 PM
Share

Teachers Day : शिक्षक, गुरु, टीचर… आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. करिअरला योग्य दिशा देण्यापासून शिस्त शिकवण्यापर्यंत आणि आयुष्यातील कठीण प्रसंगी योग्य मार्ग दाखवण्यापर्यंत, शिक्षक आपल्याला केवळ शिक्षण देत नाहीत, तर एक चांगला माणूस म्हणून घडवतात. आपल्या आयुष्यातील या गुरुजनांप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन अर्थात Teachers Day साजरा केला जातो. या दिवशी शिक्षकांच्या योगदानाची आठवण करून देताना अशा अनेक चित्रपटांचीही आठवण होते, ज्यामध्ये कलाकारांनी शिक्षकांच्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत.

पण तुम्हाला माहीत आहे का, बॉलिवूडमधील काही कलाकारांनी केवळ पडद्यावरच शिक्षकाची भूमिका साकारलेली नाही, तर खऱ्या आयुष्यातही त्यांनी शिक्षक म्हणून काम केलंय. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी काही कलाकारांनी मुलांना शिकवलं, प्रशिक्षण दिलं आणि त्यांना घडवण्याचं काम केलं. जाणून घेऊया अशाच काही लोकप्रिय कलाकारांविषयी…

अक्षय कुमार – मार्शल आर्ट्स प्रशिक्षक : ॲक्शन आणि स्टंट्ससाठी ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमार अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण देत होता. मुंबईत तो मुलांना मार्शल आर्ट्ससोबतच सेल्फ-डिफेन्सचे धडेही देत असे. पुढे याच कौशल्याचा त्याला अभिनयाच्या कारकिर्दीतही मोठा फायदा झाला.

कादर खान – कॉलेजचे प्राध्यापक : विनोदी अभिनय आणि दमदार संवादफेकीसाठी प्रसिद्ध असलेले दिवंगत अभिनेते कादर खान यांची कारकीर्दही तितकीच रंजक होती. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी ते मुंबईतील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते. तेथे ते सिव्हिल इंजिनिअरिंग शिकवत असत.

चंद्रचूड सिंह – संगीत शिक्षक : ‘माचिस’ आणि ‘जोश’ यांसारख्या चित्रपटांमधून लोकप्रिय झालेल्या चंद्रचूड सिंह याला संगीताची विशेष आवड आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्याने दून स्कूलमध्ये संगीत शिक्षक म्हणून काम केलं होतं. त्यामुळे अभिनयासोबतच संगीताशीही त्याची नाळ कायम जोडलेली राहिली.

कियारा अडवाणी – नर्सरी स्कूलमध्ये शिक्षिका : आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली कियारा अडवाणी हिनेही अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी शिक्षिका म्हणून काम केले आहे. तिने एका नर्सरी स्कूलमध्ये लहान मुलांना शिकवण्यासोबतच त्यांची काळजी घेण्याचे काम केलं.

अनुपम खेर – अभिनयाचे शिक्षक : अनुपम खेर हे केवळ दिग्गज अभिनेतेच नाहीत, तर अभिनयाचे उत्तम शिक्षकही आहेत. त्यांनी स्वतःचे ॲक्टिंग स्कूल सुरू केले असून, येथे नवोदित कलाकारांना अभिनयातील बारकावे शिकवले जातात. अभिनय क्षेत्रातील अनेक कलाकारांना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे.

बलराज साहनी – इंग्रजीचे शिक्षक : ज्येष्ठ अभिनेते बलराज साहनी यांनी इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं होतं. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी शांतिनिकेतन येथील विश्वभारती विद्यापीठात इंग्रजी शिक्षक म्हणून काम केले होते. पुढे त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रातही आपला ठसा उमटवला.

सान्या मल्होत्रा – डान्स टीचर : ‘दंगल’ आणि ‘बधाई हो’ यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली सान्या मल्होत्रा अभिनयात येण्यापूर्वी डान्स शिकवत होती. दिल्लीतील एका शाळेत तिने मुलांना बेली डान्सचे प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश करत तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

टॉम ऑल्टर – क्रिकेट प्रशिक्षक : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ अभिनेते टॉम ऑल्टर हे अभिनयासोबतच क्रिकेटशीही जोडलेले होते. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी हरियाणातील सेंट थॉमस स्कूलमध्ये मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण दिले होते. अभिनय क्षेत्रात आल्यानंतर त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

शिक्षक म्हणून मुलांना घडवण्यापासून ते पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यापर्यंतचा या कलाकारांचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यामुळे या शिक्षक दिनी, पडद्यामागील या ‘शिक्षक’ कलाकारांचीही आठवण ठेवायला हवी.

Follow Us
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथक...
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथकांना मोठं आवाहन