Maharashtra Vidhan Parishad Election Full Results 2022 and MLC Polls LIVE updates : भाजपचे 5, महाविकास आघाडीचे 5 उमेदवार विजयी, फडणवीसांचा पुन्हा आघाडीला चेकमेट
Maharashtra Vidhan Parishad Election Results 2022 and MLC Polls Vote Counting LIVE updates : भाजपचे पाचही उमेदवार विजयी, प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, हे भाजपचे पाचही उमेदवार विजयी, तर काँग्रेसचे भाई जगताप पराभूत झाले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकांचे क्षणाक्षणाचे ताजे अपडेट्स, राजकीय ब्रेकिंग न्यूज जाणून घ्या एका क्लिकवर...

Maharashtra Vidhan Parishad Election 2022 (Maharashtra legislative council election result live) : विधान परिषदेच्या राजकीय घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर ….विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी सकाळपासूनचं सुरूवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या आमदारांची काळजी घेतली आहे. सकाळी नऊ वाजता मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदान चारवाजेपर्यंत होणार आहे. सायंकाळी पाचनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आज दिवसभरात राजकारण अनेक घडामोडी घडणार आहेत. विधान परिषदेचा निकाल पाहा फक्त tv9 marathi सोबत
Vidhan Parishad Election Result 2022
LIVE NEWS & UPDATES
-
आमदार रवी राणा Live
दलित उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा शिवसेना आणि काँग्रेसने बळी घेतला
दोन महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील
दोन महिन्यात आम्ही अविश्वास प्रस्ताव आणू
-
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं ट्विट
3 पैकी 3 आणि आता 5 पैकी 5 !
राज्यसभा असो की विधानपरिषद
विजेता फक्त भाजपाच !
॥ जय महाराष्ट्र ॥ @BJP4Maharashtra #LegislativeCouncilElections #Maharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 20, 2022
-
-
भाजप नेते मोहित कंबोज यांचं ट्विट
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन श्री देवेन्द्र फडणवीस जी क़ो , क्या बोला था खेला होगा !
106 to 133 @Dev_Fadnavis Ji
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) June 20, 2022
-
भाजप नेते मोहित कंबोज यांचं ट्विट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने सरकार चलाने की नैतिकता खो दी आज !
खुद से इस्तीफ़ा देना चाहिए !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) June 20, 2022
-
भाजप नेते मोहित कंबोज यांचं ट्विट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने सरकार चलाने की नैतिकता खो दी आज !
खुद से इस्तीफ़ा देना चाहिए !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) June 20, 2022
-
भाजप आमदार नितेश राणे Live
देवेंद्र फडणवीस नावाचा जादूगर आमच्याकडे आहेत
त्यांची जादू ही विरोधकांच्या आमदारांवरही चालते
आम्हाला आमचा विजय होणार हे आम्हाला माहिती होतं
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना हे झेपणारं नाही
मुख्यमंत्री असून त्यांचे आमदार त्यांना ऐकत नाहीत
रणनिती कशी बनवावी याचं उत्तम प्रशिक्षण फडणवीसांच्या विद्यापीठात मिळतं
-
शिवसेनेच्या आमदारांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश
उद्या शिवसेनेची तातडीची बैठक
राज्यसभेचा किस्सा पुन्हा रिपिट
काँग्रेसच्या उमेदवाराचा दारूण पराभव
शिवसेनेच्या बाठकीत मोठा निर्णय होणार?
-
भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील Live
यांना मी निर्लज म्हणणार नाही
एवढ्यातूनही त्यांना कळत नसेल तर काय बोलणार
हे पाठीत खंजीर खूपसून निवडून आले
-
हंडोरेंच्या पराभवानंतर संजय निरुपम यांची सडकून टीका
दलित उमेदवार चंद्रकांत हंडोरे ज्यांना काँग्रेस आमदारांच्या पहिल्या पसंतीची मते मिळायची होती ते काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराकडून पराभूत झाले हे खरोखरच दुर्दैवी आहे. ही अंतर्गत दुफळी आहे, असे ट्विट आता काँग्रेस नेते संजय निरुपम याांनी केली आहे.
Its really unfortunate that a Dalit candidate Chandrakant Handore who was supposed to get first preference votes of Congress MLAs lost to the 2nd preference candidate of Congress party.
Its nothing but an internal subotage.
My sympathy with Handore.#MLCElection#Maharashtra— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) June 20, 2022
-
भाजपचे विजयी उमेदवार प्रवीण दरेकर Live
अकेला देवेंद्र क्या कर सकता है म्हणाले होते ते करून दाखवलं
जनतेचा आमच्यावरचा विश्वास दिसून आला
मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप यांनी लोकशाहीचा सन्मान करत मतादान केल्याबद्दल आभार
तीन पक्षांचं सरकार असाताना फडणवीसांनी करून दाखवलं आहे
सर्व पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे
आता केवळ फडणवीस राज्याचे नेतृत्व करून शकतात हे जनतेने दाखवून दिलं आहे
अडीच वर्षा विकासाचा घोळ झाला आहे, अपक्ष तर सोडा सत्तेतले आमदारही समाधानी नाहीत
नाना पटोले सांगतात आमच्यात एकी नाही, तर राज्यातल्या जनतेला तुम्ही काय न्याय देणार
उमेदवार दिल्यानंतर यांना चव्हाट्यावर आण्यासाठी मागे घेतला नाही
फडणवीसांनी जसे आदेश दिले तसे आम्ही काम केलंय
भारतीय जनता पार्टी एकसंघ आहे
-
भाजपचे विजयी उमेदवार प्रसाद लाड विजयी
उद्धव ठाकरेंना मी विनंती करेन की आत्ता तरी पोपटाचा गळा आवळा
हा विजय फडणवीसांचा आहे, भारतीय जनता पार्टीचा आहे
-
देवेंद्र फडणवीसांची खेळी पुन्हा यशस्वी
-
भाजपचे प्रसाद लाड दणदणीत विजयी
-
असंतोष धुमसत राहिला की काय होतं हे आजच्या निकालानं दाखवून दिलं – फडणवीस
असं आहे की चमत्कार मी मानत नाही. याठिकाणी सरकारमधील असंतोष मतांमध्ये परिवर्तीत झालाय. असंतोष धुमसत राहिला की काय होतं हे आजच्या निकालानं दाखवून दिलं आहे.
तुम्हाला कुणाची जी मतं फुटलेली दिसतात, तो तुमचा कयास आहे. जे सत्तेत आहेत ते केवळ आम्हाला माहिती आहे. सगळ्या पक्षातील त्या आमदारांचे, अपक्ष आमदारांचे मी आभार मानतो. आमचे पाचही उमेदवार विजयी करण्यात त्यांनी हातभार लावला.
आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही, तर जनतेसाठी आणि परिवर्तनासाठी आहे.
-
मी पहिल्यापासून सांगत होतो की महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे, समन्वय नाही – फडणवीस
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. आम्ही राज्यसभा निवडणुकीत १२३ मतं घेतली होती. आता १३४ मतं घेतली आहे. मी पहिल्यापासून सांगत होतो की महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे. समन्वय नाही. सरकारवर आमदारांचा विश्वास नाही. म्हणून आपल्या सदसदविवेक बुद्धीनं आमदार आमच्या पाचव्या उमेदवाराला मत देतील आणि तेच झालं. आमच्या पाचव्या उमेदवाराला एकही मत नव्हतं. पण आमचा पाचवा उमेदवार विजयी झाला.
पुन्हा एकदा मी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचे आभार मानतो. आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आज महाराष्ट्र उभा आहे. या निकालाने महाराष्ट्रात नवी नांदी पाहायला मिळत आहे. आज सरकारमधील असंतोष बाहेर आलाय. आमचा संघर्ष असाच सुरु राहील. लोकाभिमुख सरकार आणल्यावरच आमचा संघर्ष संपेल.
-
विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजपचा विजयी जल्लोष
विधान परिषद निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाल्यानंतर विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजपचा विजयी जल्लोष सुरु आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे सर्व नेते उपस्थित आहेत. विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं जात आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
Historic moment ! ✌?
Interaction with media from Vidhan Bhavan.#BJPwins#Mumbai #VidhanParishadElections #Maharashtra https://t.co/e2udYEAcYH— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 20, 2022
-
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस आणि विजयी उमेदवारांचं अभिनंदन
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपला पाचही जागांवर मिळालेल्या विजयाबद्दल सर्व विजयी उमेदवारांचे व भाजप महाराष्ट्र, श्री @Dev_Fadnavis जी व श्री @ChDadaPatil जी अभिनंदन. @BJP4Maharashtra
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 20, 2022
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या सर्व पाचही उमेदवारांचा विजय झाला, हे श्री @Dev_Fadnavis जी व श्री @ChDadaPatil जी यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांचे यश आहे. सर्व विजयी उमेदवारांचे व चंद्रकांत दादा व देवेंद्रजी यांचे खूप अभिनंदन.@BJP4Maharashtra
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 20, 2022
भाजपाचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांचा दणदणीत विजय म्हणजे “अकेला देवेंद्र क्या करेगा?” या प्रश्नाला दिलेले सणसणीत उत्तर आहे.
भाजपाचे सर्व विजयी उमेदवार मा.@Dev_Fadnavis
आणि भाजप उमेदवारांना मतदान केलेल्या सर्व आमदारांचे मनापासून अभिनंदन ????— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 20, 2022
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणूकीत भाजपचे 5 ही उमेदवार निवडून आल्या बद्दल सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन !
देवेंद्र फडणवीस साहेब तसेच चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा भाजपची खेळी यशस्वी..!!@Dev_Fadnavis @ChDadaPatil
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) June 20, 2022
-
‘महाराष्ट्र सीएम कैसा हो, देवेंद्र फडणवीस जैसा हो’, भाजप आमदारांची घोषणाबाजी
महाविकास आघाडीला धक्का देत भाजपनं विधान परिषदेत पाचवी जागाही निवडून आणली आहे. यावेळी भाजप आमदारांनी विधान भवनात जोरदार घोषणाबाजी केली. ‘महाराष्ट्र सीएम कैसा हो, देवेंद्र फडणवीस जैसा हो’, अशा घोषणा भाजप आमदारांनी दिल्या.
-
काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत
भाजपचे प्रसाद लाड यांचा दणदणीत विजय
काँग्रेसचे भाई जगताप यांचाही विजय
दहाव्या जागेवर काँग्रेसला मोठा झटका
-
प्रसाद लाड हे विजयाच्या जवळ
काँग्रेसचे दोन्ही उमेदवार कोट्याजवळ पोहोचले नाहीत
कुणाची मतं फुटली?
भाजपचे प्रसाद लाड विजयी होण्याची दाट शक्यता
काँग्रेसच्या उमेदवारांचं भवितव्य अडचणीत?
-
एका जागेचा सस्पेन्स अद्याप कायम
-
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ Live
अतिशय चांगल्या मतांनी आमच्या उमेदवारांना विजयी केले
आज आषाढी वारी सुरू होतेय, आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे
-
राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार एकनाथ खडसे Live
ही भाजपला मोठी चपराक आहे, सर्व विषय योग्य वेळी बाहेर येतील
भाजपने मला राजीनामा द्यायला भाग पाडलं
माझा दाऊदशी संबंध जोडला
ईडीची चौकशी माझ्या मागे लावली
माझी मालमत्ता सीझ करण्यात आली
गेल्या तीन आठवड्यापूर्वी मला बेघर करण्याचा प्रयत्न केला
एकही रुपया माझ्या परिवारच्या अकाऊंटला ठेवला नाही
मात्र जनतेचा मला आशीर्वीद आहे
राष्ट्रवादीने मला अशा वेळी मदतीचा हात दिला
आता पुढच्या काळात माझ्या पक्षाचा विस्तार करण्यातसाठी अनुभव कामाला लावेल
जो तो पक्ष आपल्या परीने लढत असतो
एकनाथ खडसे पुन्हा एकदा बॅक इन एक्शन दिसणार
-
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील Live
भाजपला घोडेबाजार करण्याची सवय आहे
काँग्रेसकडे मुळातच मर्यादित मतं होती
काँग्रेस नेत्यांनी चांगले प्रयत्न केले
भाई जगताप यांनी चांगली मजल गाठली
-
प्राथमिक माहितीनुसार आघाडीची 21 मतं फुटली
महाविकास आघाडीतला अंतर्गत रोष बाहेर आला?
महाविकास आघाडीसाठी सर्वात मोठा दणका
दुसऱ्या पसंतीची लाड यांना 8 मतं मिळाली
शिवसेनेची 3 मतं गेली कुणाला?
-
शिवसेनेचे विजयी उमेदवार सचिन अहिर Live
पक्षाला आणखी पुढे घेऊन जाण्याचं काम करीन
आता सर्व मतांचं विश्लेषण केले जाईल
पक्षातील प्रमुख याबाबत बोलतील
प्रसाद लाड यांच्या पत्नीने मानले फडणवीसांचे आभार
-
भाजपच्या वतीने जोरादर सेलिब्रेशन सुरू
उमा खापरेंनी फडणवीसांना मिठाई भरवून आनंद साजरा केला
भाजपच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस
भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर पाचही उमेदवारांच्या विजयाचे बॅनर
संख्याबळ नसतानाही भाजपचे प्रसाद लाड हे जिंकले
राज्यभेतल्या पराभवानंतरही महाविकास आघाडी गळती रोखण्यात अपयशी
-
महाविकास आघाडीच्या गोटात पुन्हा खळबळ
अटीतटीच्या लढतीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी
फडणवीसांनी पुन्हा राज्यसभेचा किस्सा रिपीट करून दाखवला
महाविकास आघाडीत पुन्हा मोठी अस्वस्था
-
काँग्रेसची दोन मतं फुटली, भाजपला फायदा
महाविकास आघाडीला पुन्हा एक मोठा झटका
काँग्रेसचे भाई जगताप पराभूत
भाजपचे पाचही उमेदवार विजयी
-
भाजपचे पाचही उमेदवार विजयी
फडणवीसांचा महाविकास आघाडीला पुन्हा चेकमेट
काँग्रेसच्या भाई जगताप यांचा दारूण पराभव
प्रसाद लाड यांचा दणदणीत विजयी
काँग्रेसचा दुसरा उमेदवार हरला
राज्यसभा निवडणुकीचा किस्सा रिपिट
-
भाजपचे प्रसाद लाड जिंकण्याची शक्यता
भाई जगताप यांना मोठा फटका बसणार?
-
कोण किती मतांनी विजयी झालं?
शिवसेना
आमशा पाडवी – विजयी -26 मते
सचिन अहिर- विजयी – 26 मतेराष्ट्रवादी काँग्रेस
एकनाथ खडसे -विजयी-27७
रामराजे नाईाक निंबाळकर -विजयी- 26भाजपा
प्रवीण दरेकर – विजयी- 29
राम शिंदे – विजयी- 30
श्रीकांत भारतीय- विजयी- 30
उमा खापरे – विजयी 27काँग्रेस
चंद्रकातं हंडोरे – विजयी- 26 -
भाजपचे चार उमेदवार विजयी
राम शिंदे, विजयी
प्रवीण दरेकर, विजयी
श्रीकांत भारतीय, विजयी
उमा खापरे, विजयी
-
शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे दोन दोन उमेदवार विजयी
शिवसेनेचे सचिन अहिर विजयी
हामशा पडवी शिवसेनेचे उमेदवार विजयी
रामराजे नाईक निंबळकर विजयी
तर एकनाथ खडसेही दणक्यात विजयी
-
शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी
सचिन अहिर, विजयी, शिवसेना
आमशा पाडवी, विजयी, शिवसेना
-
बाद मतासाठी भाजपची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार
भाजपच्या कोट्यातलं एक मत बाद
भाजपने निवडणूक आयोगाला लेखी तक्रार दिली
उमा खापरेंच्या कोट्यातलं एक मत वाचवण्यासाठी प्रयत्न
-
भाजप नेते अनिल बोंडे Live
महाविकास आघाडीत समन्वय नाही
नाना पटोले तर नागपुरात पोहोचले मैदान सोडून
पराभव हा त्यांना दिसल्यानेच ते नागपुरात आलं
मुख्यमंत्री म्हणतात माझं कुटुंब माझी जबाबदारी
अजित पवारही म्हणाले असतील माझं कुटुंब माझी जबाबदारी
-
शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर Live
निकाल बाकी आहे, त्यामुळे थोडा वेळ वाट पाहवी लागणार आहे
रामराजेंचं एक मत बाद झालं, त्यावर पेडणेकर म्हणातात, भाजपचा रडीचा डाव सुरू झाला
-
काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे Live
दोन मतांवर आक्षेप घेण्यात आला
मतं बाजुला काढून ठेवल्याची माहिती माझ्यापर्यंत आली आहे
बाद झाल्याची माहिती अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाही
-
मतमोजणीला पुन्हा सुरूवात
राष्ट्रवादी आणि भाजपच्या कोट्यातलं एक-एक मत बाद
पहिल्या पसंतीची मत मोजली जात आहेत
283 आमदारांच्या मतांची मोजणी सुरू होणार
एक मत बाद झाल्याने भाजपची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव
राष्ट्रवादीही निवडणूक आयोगाकडे दाद मागणार
-
भाजप नेते सुधीर मुनगंटीवर Live
आमदारांबाबत शिवसेनेने आरोप करणे गैर आहे
सुधीर मुनगंटीवार यांचा अप्रत्युरित्या संजय राऊतांना टोला
जो विश्वास राज्यभेवेळी होता तोच आत्ताही आहे
-
विधान परिषद निवडणुकीचा निकाल Live
बाद मतांवरून भाजप केंद्रीय निवडणूक आयोगाल तक्रार करणार
भाजपच्या उमा खापरेंच्या कोट्यातलं एक मत बाद
काही क्षणात विधान परिषदेचा पहिला निकाल हाती येणार
-
विधान परिषद निवडणुकीचा निकाल Live
शिवसेनेने पहिल्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची 35 मतं दिल्याची सुत्रांची महिती
दुसऱ्या उमेदवाराला 29 मतं दिल्याची सुत्रांची माहिती
असे असल्यास भाई जगताप यांना याचा थेट फायदा होऊ शकतो
बाद झालेल्या मतांचा फायदाही महाविकास आघाडीला होण्याची शक्यता
मतांचा कोटा यामुळे कमी होणार आहे
कोटा कमी झाल्यास महाविकास आघाडीला मिळणार फायदा
बाद मतांवरून राष्ट्रवादी आक्षे घेणार
भाजपही घेणार बाद मतावर आक्षेप
-
भाजप आणि राष्ट्रवादीचं एक-एक मत बाद
रामराजे आणि उमा खारपे यांच्या कोट्यातलं एक-एक मत बाद
रामराजे यांच्यासाठी 29 मतांचा कोटा होता
आता रामराजेंसाठी उरली 28 मतं
हा कोटाही आता बदलणार
रामराजे नाईक निंबळकर अजूनही सेफ झोनमध्ये
-
मतपत्रिकांची छाननी पूर्ण झाल्याची माहिती
दोन मतं बाजुला ठेवली गेली
दोन मतांवर निवडणू आयोग निर्णय घेईल
यावरील आक्षेपाला लेखी उत्तरही द्यावं लागलं
दोन मतांवर निर्णय झाल्यावर मतांची मोजणी सुरु होणार
-
बाजुल्या काढलेल्या दोन मतांचं काय करायचं हे नंतर ठरणार
या मतावर केंद्रीय निवडणूक आयोगाचे मतही घेतले जाणार
त्यानंतर बाजुला काढलेल्या दोन मतांबाबत निर्णय होणार
-
भाजपच्या कोट्यातलं एक मत बाजुला काढण्यात आलं
उमा खापरे यांच्या कोट्यातलं एक धोक्यात आल्याची सुत्रांची माहिती
काही वेळातच याबाबतची स्पष्टता येणार
ओव्हररायटिंग करणे यावर आक्षेप घेण्यात आला आहे
यावरही निवडणूक आयोगच निर्णय घेणार
मतपत्रिपकेवरही काही गिरवण्यास मनाई
-
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरूवात केली
शिवेसनेच्या कार्यकर्त्यांचाही जल्लोष सुरू
आदिवासी नृत्य करत आमशा पाडवी यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
भाजपचा रडीचा डाव सुरू झाला आहे-किशोरी पेडणेकर
-
भाजप नेते सुधीर मुनगंटीवर Live
भाजप आपल्या आमदारांवर कधीच शंका घेत नाही
आम्हाला सर्व उमेदवारांच्या विजयाची खात्री आहे
महाविकास आघाडीत उमेदवार द्या असे अपक्ष आमदारांचेच मत होते
त्यामुळे आम्ही विधान परिषदेसाठी पाचवा उमेदवार दिला
-
रामराजेंच्या कोट्यातलं तिसरं मत बाजुला काढलं आहे
त्या एका मताबाबत कोणताही निर्णय झाला नाही
ते मत आत्ता फक्त बाजुला काढून ठेवलं
मतपत्रिकेवर खाडाखोड झाल्याने भाजपचा आक्षेप
-
भाजप खासदार अनिल बोंडे Live
एक मत बाद झाल्यास खूप मोठा फरक पडणार आहे
एक मत बाद झालं म्हणजे शंभर गुण कमी झाले
भाजप काँग्रेसएवढे घाणेरडे राजकारण करत नाही
एवढे आजारी असताना ते येतात त्यांचं कौतुक नाही करायचं मात्र त्यावर आक्षेप घेतात
-
तिसऱ्या क्रमांकावर मतपत्रिकेवर पेनाच्या खानाखूना
आशिष शेलार यांनी या मतावर आक्षेप घेतला आहे
रामराजे नाईक निंबाळकरांच्या कोट्यातल्या मतावर आक्षेप
या मतांची छाणनी अद्यापही सुरू
-
मतमोजणीवेळी रामराजे निंबळकर आणि भाजपमध्ये वाद सुरू
आशिष शेलार यांनी या मतावर आक्षेप घेतला आहे
शिवसेना आणि काँग्रेसचे सर्व बडे नेते विधान भवनातून निघाले
-
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार Live
आमची भूमिका या निवडणुकीत जास्त महत्वाची होती
आम्हाला सर्वांनी शोधत मतादन करण्याचं आवाहन केलं
प्रत्येक अपक्ष आमदाराची भूमिका ही ठरलेली होती
काही लोक महाविकास आघाडीसोबत होते
तर कर काही आमदार भाजपसोबतही होते
मी महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून सोबत
-
रामराजे निंबाळकरांच्या कोट्यातल्या एका मतावर आक्षेप
29 चा कोटा राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवलेला होता
29 मतं रामराजे निंबाळकर यांच्यासाठी आहेत
अजूनही रामराजे सेफ झोनमध्येच आहेत
-
आमदार बच्चू कडू विधान परिषदेच्या निकालावर Live
चार भाजप आणि सहा महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणू येणार आहेत
भाजपचा एक उमेदवार पडणार आहे हे नक्की आहे
मतं ही फुटायसाठीच असातात, मतं ही कुणाच्या हातात नसतात
निवडणुकीचा रोख काही वेगळा असतो आणि निकाल काही वेगळे असतात.
-
किशोरी पेडणेकर विधान परिषद निकालावर Live
महाविकास आघाडी सर्व उमेदवार जिंकणार
सर्व आमचे पदाधिकारी गुलाल घेऊन आले आहेत
गुलाल हा आमचाच उधळला जाणार
मागच्या निकालाची पुनरावृत्ती होऊ देणार नाही
निकालाची वाट बघावी, काही क्षणात जल्लोष जोरात होईल
आम्ही जल्लोषाच्या तयारीतच आलेलो आहे
-
काँग्रेस नेते नाना पटोले Live
काही वेळातच अतिउत्साही भाजपला कळेल
निवडणूक आयोगाने आधी दिलेले निकाल आपण पाहिले आहेत
मतदानाचे नियम डावलून भाजपने मतदान केलं आहे
आमच्या विरोधात निवडणूक आयोगाने निर्णय दिला, त्याविरोधात आम्ही कोर्टात जाऊ
-
मतमोजणीला सुरूवात
कुणाला किती मतं मिळणार? काही वेळातच पहिला निकाल हाती येणार
अपक्षांची साथ कुणाला मिळणार? संपूर्ण महाराष्ट्राताला निकालाची प्रतीक्षा
थोड्याच वेळात दहाव्या उमेदवाराचं भिवतव्य ठरणार
-
खडसे समर्थकांनी विधान भवनाबाहेर टरबुजं फोडली
खडसेंच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
टरबूज फोडून भाजपची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न
विधान भवनाबाहेर महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते जमले
-
शिवसेनेचे दोन्ही उमेदवार सेफ झोनमध्ये
सजिन अहिर यांच्या कार्यकर्त्यांची विधान भवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी
सचिन भाऊ अंगार है, बाकी सब भंगार है,
निकालाआधीच सचिन अहिरांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
-
विधान भवनाबाहेर कार्यकर्ते टरबूज घेऊन आले
टरबूज हातात घेऊन कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील, कार्यकर्त्यांना विश्वास
खडसे समर्थकांचा टरबूज घेऊन जल्लोष
-
पाचही जागा जिंकतील असा भाजप नेत्यांचा दावा
काही वेळापासून मतांची छाणनी सुरू
पहिला निकाल काही वेळातच येण्याची शक्यता
खडसे समर्थकांचा विधान भवनाबाहेर जल्लोष
-
राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांसाठी 29 मतांचा कोटा
या कोट्यानुसार दोन्ही उमेदवार सेफ झोनमध्ये
काँग्रसचेही दोन्ही उमेदवार जिंकणार?
काही वेळातच निकाल हाती येणार
भाजपच्या प्रसाद लाड यांची जागा अडचणीत?
-
काही वेळात पहिला कल हाती येणार
प्रत्येक पक्षाकडून तीन प्रतिनिधी मतमोजणीसाठी उपस्थित
राष्ट्रवादीकडून काँग्रेसला मदत केल्याची माहिती
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला
विधान भवनाबाहेर सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जमले
-
मतमोजणीच्या प्रक्रियेला अखेर सुरूवात
अभिजीत वंजारी, सतेज पाटील, अमर राजूरकर हे काँग्रेसचे मतमोजणीसाठी प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार सध्या सेफ झोनमध्ये
-
दहाव्या जागेसाठी प्रसाद लाड आणि भाई जगताप यांच्यात चुरस
ज्या उमेदवाराला जास्त मतं तो उमेदवार विधान परिषदेवर जाणार
काँग्रेसने व्यक्त केला भाई जगताप यांच्या विजयाचा विश्वास
विश्वजीत कदम म्हणतात आमचे सर्व उमेदवार जिंकणार
-
भाजपच्या चार उमेदवारांना पहिल्या पसंतीची मतं
राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर यांना पाहिल्या पसंतीची मतं
प्रसाद लाड यांना दुसऱ्या पसंतीची मतं
लाड यांची सीट सध्या तरी धोक्यात?
-
काँग्रेसच्या आक्षेपामुळे मतमोजणीला दोन तासांनी सुरूवात
काँग्रेसच्या आक्षेपामुळे दोन तास मतमोजणी उशीरा सुरू
भाजपला निवडणूक आयोगाचा मोठा दिलासा
-
केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसचे आक्षेप फेटाळले
मतांची छाननी करण्यास सुरूवात
आधी मतांची पडताळणी सुरू
वैध मतं, अवैध मतं ठरवली जाणार
-
प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीचं एकही मत नाही, दुसऱ्या पसंतीच्या मतांवरच विसंबून राहावं लागणार
भाजपनं आपल्या उमेदवारांसाठी 30 मतांचा कोटा निश्चित केलाय. त्यामुळे भाजपच्या पहिल्या चार उमेदवारांना 30, 30, 29 आणि 28 असा कोटा निश्चित करण्यात आलाय. त्यामुळे लाड यांची भिस्त अपक्ष आणि ट्रान्सफर मतांवर अवलंबून असेल.
-
अखेर मतमोजणीला सुरुवात, तासाभरात निकाल हाती येणार?
विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काँग्रेसनं भाजप आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतांवर आक्षेप घेतला होता. मात्र, निवडणूक आयोगाकडून काँग्रेसचा आक्षेप फेटाळण्यात आला. त्यानंतर अखेर दोन तास उशिराने मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
-
भाजप उमेदवार राम शिंदे यांच्या निवासस्थानी जल्लोषाची तयारी
>> माजी मंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी जमायला सुरवात
>> आई भामबाई शिंदे यांच्याकडून देव पूजा करण्यात आली
>> राम शिंदे यांची विधान परिषदेत वर्णी लागण्याची कार्यकर्त्यांनी मध्ये आनंदच वातावरण
>> 22 तारखेला कर्जत-जामखेड येथे मोठा जल्लोष करणार
-
राष्ट्रवादीचे रामराजे निंबळकर सेफ झोनमध्ये
-
रवी राणा आणि किशोरी पेडणेकर यांच्यात चर्चा
राजकारणातले कट्टर वैरी जेव्हा एकमेकांना भेटतात
राणा आणि पेडणेकर यांच्यात विधान भवन परिसरात चर्चा
-
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर काँग्रेस कोर्टात जाणार नाही
-
अहमदनगर – माजी मंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी जमायला सुरवात
तर आई भामबाई शिंदे यांच्याकडून देव पूजा करण्यात आली
राम शिंदे यांची विधान परिषदेत वर्णी लागण्याची कार्यकर्त्यांनी मध्ये आनंदच वातावरण
22 तारखेला कर्जत-जामखेड येथे मोठा जल्लोष करणार
-
केंद्रीय निवडणूक आयोग पुढील दहा मिनिटात निर्णय देणार
केंद्रीय निवडणूक आयोग लवकच निर्णय देण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मतमोजणीचं भवितव्य अलंबून असणार आहे
-
मुक्ताईनगरमध्ये खडसेंच्या विजयाचे बॅनर
विधान परिषद निकाल आधीच एकनाथ खडसे यांचा दणदणीत विजय असे खडसे समर्थकांकडून मुक्ताईनगरात लावण्यात आले बॅनर
-
केंद्रीय निवडणूक आयोगाला भाजपचं उत्तर
भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर पाठवलं आहे. त्यांनी परवानगीची पत्रं सुद्धा सोबत जोडली आहे. सर्व पुरावे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर
-
भाजपने मतांचा क्रम बदलला, उमा खापरे अडचणीत?
प्रसाद लाड यांच्यासाठी मतांचा कोटा बदलला
विश्वसनीय सुत्रांची माहिती
काही वेळातच मतमोजणीला सुरूवातहोण्याची शक्यता
कोणताही कोटा बदलला नसल्याचे भाजपचे स्पष्टीकरण
-
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर काँग्रेस कोर्टात जाणार नाही
केंद्रीय निवडणूक आयोगांच्या निर्णयानंतर मतमोजणीला सुरूवात होणार
थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होणार अशी शक्यकात आहे
काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती तक्रार
-
अनिल बोंडेंची पुन्हा काँग्रेसवर टीका
खासदार अनिल बोंडे यांनी पुन्हा ट्विट करत काँग्रेसवर टीका केली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनीही काँग्रेसला लाथाळलं. अशा आशयाचे ट्विट बोंडे यांनी काँग्रेसचा आक्षेप फेटाळल्यावर केलं आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांनीही काँग्रेसला लाथाळलं…#MLCElection2022 #Congress
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) June 20, 2022
-
शिवसेने नेते संजय पवार Live
शिवसेने सर्वसामान्य लोकांना मोठं करण्याचं काम केलं आहे
विधान परिषदेचा गुलाल उधळायला याठिकाणी आलोय
गुलाल उधळूनच घरी जाणार आहे
मागच्या वेळी झालेल्या चुका यावेळी होणार नाहीत
-
राष्ट्रवादीची पहिल्या पसंतीची मतं रामराजे निंबाळकरांना-सूत्र
एकनाथ खडसे यांना दुसऱ्या पसंतीची मतं मिळाल्याची सुत्रांची माहिती
ज्या चुका घडतात त्या चुका सुधारण्याचं काम तिन्ही पक्षांनी केला आहे-संजय पवार
-
देवेंद्र फडणवीस विधान भवनात ठाण मांडून बसले
इतर आमदारही विधान भवनात येण्यास सुरूवात
एक तास उलटला तरी मतमोजणी सुरू नाही
मात्र काही वेळातच मतमोजणीला सुरूवात होण्याची शक्यता
अजित पवार आणि मुख्यमंत्री विधान भवनातून निघाले
-
दिलीप वळसे पाटील Live
आमचे सर्व उमेदवार विजयी होतील
आम्हाला सहा उमेदवारांच्या विजयाचा आक्षेप
निवडणूक आयोग आक्षेपाबाबत योग्य निर्णय घेईल
भाजपला पाच उमेदवारांच्या विजयाचा विश्वास
-
एक तास होत आला तरी मतमोजणी लांबणीवर
केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक अजूनही सुरू
राज्य निवडणूक आयोगालाही केंद्रीय आयोगाच्या निर्णयाची प्रतीक्षा
आयोगाच्या निर्णयापर्यंत मतमोजणी करता येणार नाही
-
मुक्ता टिळक यांच्या परवानगीचं पत्र
मुक्ता टिळक यांना मिळालेल्या परवानगीचे पत्रही आलं समोर, लक्ष्मण जगताप यांच्याही परवागीचे पत्र आले समोर, त्यामुळे काँग्रेसचा आक्षेप केंद्रीय निवडऊक आयोगही फेटाळण्याची शक्यता
-
मंत्री जयंत पाटील Live
त्यांना जो आक्षेप होता त्यावर त्यांनी घेतला
आता त्यावर योग्य तो निर्णय होईल
भाजपचं वागणं असंवेदनशील आहे
हे दोन्ही आमदार गंभीर असताना त्यांना पुण्यातून आणलं
आक्षेपाबाबत मी जास्त बोलणार नाही
-
लक्ष्मण जगताप यांचं परवानगी पत्र
लक्ष्मण जगताप यांनी मतासाठी आवश्यक ती परवागी घेतली होती. तसे पत्र समोर आले आहे. त्यामुळे आता फक्त केद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाची पतिक्षा आहे.
-
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला
विधान भवनाच्या बाहेर आदीवासी नृत्य
पारंपारिक वेषात आदीवासी बांधव विधान भवनाबाहेर दाखल
हमशा पाडली यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
-
भाजप आमदार गोपीचंद पडळकर Live
काँग्रेसने घेतलेला आक्षेप दुर्दैवी
काँग्रसे या दोन्ही नेत्यांचा आदर करायला हवा होता
काही वेळात मतमोजणी सुरू होण्याची शक्यता
-
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात काँग्रेस कोर्टात जाणार
भाजपच्या दोन मतांवरील आक्षेप निडणूक आयोगाने फेटाळला
केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय लवकच येण्याची शक्यता
-
अनिल बोंडे यांची सडकून टीका
-
मतमोजणी अजूनही सुरू झाली नाही
कोणता एक उमेदवार पराभूत होणार
लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय येण्याची शक्यता
भाई जगताप आणि प्रसाद पाड यांच्यातील कोण विजयी होणार?
-
भाजप नेते गिरीश महाजन Live
काँग्रेसकडून चुकीचा आक्षेप घेतला आहे
गेल्या वेळीही मतदान झालं तेव्हा का आक्षेप घेतला नाही
राज्य निवडणूक आयोगाने आक्षेप फेटाळला
आता त्यांना कुठे जायचं तिकडे जावं
काँग्रेसच्या आक्षेपामुळे मतमोजणीला उशीर
-
काँग्रेसने भाजपच्या मतांवर घेतलेले आक्षेप फेटाळला
दोन मतं रद्द करण्याची काँग्रेसची मागणी होती
मात्र राज्य निवडणूक आयोगाने हा आक्षेप फेटाळला
काही वेळात मतमोजणीला सुरूवात होणार
राज्य निवडणूक आयोगाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाची प्रतीक्षा
-
आयोगाच्या निर्णयानंतर मतमोजणी सुरू होणार
-
काँग्रेसच्या आक्षेपावर अनिल बोंडेंची सडकून टीका
काँग्रेसला अवदसा आठवली, योध्यांचाही अपमान केला…
काँग्रेसला निष्ठावंतांची किंमतच कशी कळणार?
सगळी गद्दारांची फौज…..— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) June 20, 2022