Maharashtra ZP Election 2021: कोणत्या जिल्हा परिषदेत किती जागा, मिनी विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम

| Updated on: Sep 13, 2021 | 5:06 PM

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका, तसेच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. येत्या 5 ऑक्टोबरला मतदान आणि 6 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra ZP Election 2021: कोणत्या जिल्हा परिषदेत किती जागा, मिनी विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम
ईव्हीएम मशीन
Follow us on

मुंबई : कोरोनासंकट आणि ओबीसींचं (OBC) राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्रातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका, तसेच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या.

येत्या 5 ऑक्टोबरला मतदान आणि 6 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

कोणत्या जिल्हा परिषदेच्या किती जागांसाठी मतदान?

  • धुळे – 15
  • नंदूरबार – 11
  • अकोला – 14
  • वाशिम -14
  • नागपूर -16
  • पालघर पोटनिवडणूक –

नेमक्या किती पंचायत समिती जागांसाठी मतदान?

  • धुळे -30
  • नंदूरबार -14
  • अकोला -28
  • वाशिम -27
  • नागपूर -31

असा आहे निवडणूक कार्यक्रम

  • 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर अर्ज दाखल करता येणार
  • 21 सप्टेंबर अर्जाची छाननी होणार
  • 29 सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार
  • 5 ऑक्टोबरला मतदान
  • 6 ऑक्टोबरला निकाल
  • किती जागांसाठी निवडणूक
  • जिल्हा परिषदेच्या 85 जागा
  • पंचायत समितीच्या 144 जगाा

15 ते 20 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार

पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. 21 सप्टेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. पुढील टप्पे धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरच्या जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसोबत होतील. कारण या पाच जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम छाननीनंतर स्थगित करण्यात आला होता. आता पालघरसह सर्व ठिकाणी 21 सप्टेंबर 2021 रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. नामनिर्देशनपत्रासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 27 सप्टेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील, असं त्यांनी सांगितलं.

6 ऑक्टोबर रोजी मतमोजणी

अपील असलेल्या ठिकाणी 29 सप्टेंबर 2021 पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान; तर 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदेच्या एकूण 85 निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या एकूण 144 निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होईल. त्यासाठी कोरोना संदर्भातील आवश्यक ते सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजून दक्षता घेण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले असल्याचे मदान यांनी सांगितले.

संबंधित बातम्या 

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान