Gokul Election: ‘गोकुळ फक्त जिल्ह्यापुरतं, अध्यक्ष आमचाच होणार…’ हसन मुश्रीफांनी प्लॅन सांगितला!
सतेज पाटील यांच्याकडून खोटे नॅरेटिव्ह पसरवण्यात आले. गोकुळच्या विजयाचा उन्माद करण्यात आला असे म्हणत आजच्या संघर्षमोर्चात बाहेरच्याच जिल्ह्याचे लोक होते, असा आरोपही केला आहे.

Gokul Chairman Election 2026: संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळ दूध संघाची अध्यक्षपदाची निवडणूक उद्या 10 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. त्याआधी गोकुळमध्ये संचालक नियुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरमध्ये संघर्षमोर्चा काढण्यात आळा. या संघर्षमोर्चानंतर महायुतीकडून हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक आणि प्रकाश आबिटकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्याच्या अध्यक्षांच्या निवडणुकीत महायुतीचाच चेअरमन होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच सतेज पाटील यांच्याकडून खोटे नॅरेटिव्ह पसरवण्यात आले. गोकुळच्या विजयाचा उन्माद करण्यात आला असे म्हणत आजच्या संघर्षमोर्चात बाहेरच्याच जिल्ह्याचे लोक होते, असा आरोपही केला आहे.
संघर्ष मोर्चात जिल्ह्याबाहेरचे लोक, धनंजय महाडिकांचे टिकास्त्र!
“खरं पाहता महाराष्ट्र शासनाला दूधसंघ ताब्यात ठेवायचा असता तर प्रशासक नेमून ताब्यात घेता आला असता. फक्त फेक नेरेटिव्ह पसरवायचं. आजच्या मोर्चात सहकारातले अनेक दिग्गज नेते आले होते. कारखारदार असलेले नेते होते. त्यांना माझा प्रश्न आहे. सहकारामध्ये कोरमअभावी सभा होऊ शकते का? माजी गृहमंत्र्यांना एवढी कल्पना असली पाहिजी ही जनरल बॉडिलाच त्याचा अधिकार आहे. खोटे नरेटिव्ह पसरवण्याचे हे काम आहे,” असं धनंजय महाडिक म्हणाले.
तसेच “खरं म्हणजे आजच्या मोर्चाला कोल्हापुरमधील नव्हेतर बाहेरच्या जिल्ह्यातील लोकच जास्त होते. कारण गोकुळ दूध संघ हा डी वाय पाटील दूध संघ होण्यापासून वाचणार आहे, याचा कोल्हापुरकरांना आनंद आहे. आमच्या १२ लोकांनी त्यांचा चेअरमन निवडण्यासाठी हजर रहावे असं त्यांचा आग्रह होता.या विजयाचा उन्माद करण्यात आला. मुख्यमंत्र्यांबाबत अपमानजनक भाषा वापरण्यात आली.याची आम्हाला खंत होती. आजच्या मोर्चात बाहेरचे लोक होते, गोकुळ हा कोल्हापूर जिल्हाचा दूध संघ आहे, त्याचं कार्यक्षेत्र जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे,” असं म्हणत उद्याच्या निवडणुकीत आमचाच चेअरमन होईल,” असं हसन मुश्रीफ म्हणालेत.