Raj Thackeray : सगळीकडे मध्यावधी निवडणुकीची चर्चा, पण राज ठाकरे म्हणतात.. निवडणुकीचं वातावरणच दिसत नाही..मग निवडणुका होणार तरी कधी?

| Updated on: Nov 27, 2022 | 9:40 PM

Raj Thackeray : राज्यात मध्यावधी निवडणुका एका महिन्यात लागतील असा दावा विरोधक करत असताना राज ठाकरे यांचा दावा काय?

Raj Thackeray : सगळीकडे मध्यावधी निवडणुकीची चर्चा, पण राज ठाकरे म्हणतात.. निवडणुकीचं वातावरणच दिसत नाही..मग निवडणुका होणार तरी कधी?
मग निवडणुका कधी होणार?
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

मुंबई : राज्यात मध्यावधी निवडणुका (Midterm Election) कधीही लागू शकतील, त्यामुळे तयारी ठेवा असे वक्तव्य विरोधी गटातील तीनही घटक पक्ष (Mahavikas Aaghadi) सध्या करत आहेत. राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेसने त्यासाठीची तयारी सुरु केली आहे. तर ठाकरे गटाने अवघ्या काही दिवसात राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, अशी राळ उडवून दिली आहे. ठाकरे गटातील नेते दररोज मध्यावधी निवडणुकीचे वक्तव्य करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मात्र महाराष्ट्राचा सगळीकडून खोळंबा आहे, राज्यात निवडणुकीचं वातावरण दिसत नसल्याचा दावा केला आहे.

राज्यात महापालिका निवडणुकांचंही (Municipal Corporation Election) भिजत घोंगड आहे. ओबीसी आरक्षण, वॉर्ड रचना आणि इतर कारणांमुळे महापालिका निवडणुका कधी होतील, याचा अंदाज कोणीही वर्तविलेला नाही. या निवडणुकांविषयी ही सर्वांनाच उत्सुकता आहे.

यावर्षी महापालिका निवडणुका होतील असा अंदाज होता. मार्च महिन्यात निवडणुका लागतील अशी चर्चा होती. पण आपल्याला वातावरणात निवडणुका दिसत नसल्याचे वाटत होतं, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. राज्यात सगळीकडूनच खोळंबा असल्याचा दावा त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

तरीही महापालिका निवडणुका साधारणतः फेब्रुवारी, मार्चमध्ये होतील अशी चर्चा पुन्हा कानावर येत आहेत. डिसेंबर सुरु होत आहे. पण आपल्याला या निवडणुका होतील असं वाटत नाही, कारण महाराष्ट्रात निवडणुकीचं वातावरणचं दिसत नसल्याचा दावा ठाकरे यांनी केला.

त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी आणि मध्यावधी निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असणाऱ्या नेत्यांना राज ठाकरे यांचे वक्तव्य मनावर घ्यावेच लागेल. पण निदान यानिमित्तानं फेब्रुवारी, मार्च महिन्यात निवडणुका लागण्याची चर्चा हवेत विरेपर्यंत करता येईल हे नक्की.

दरम्यान कोणत्या गटाला मान्यता मिळेल. कोणत्या गटाला मान्यता मिळणार नाही. कोणाला निशाणी मिळणार, चिन्हं मिळणार याची चर्चा सुरु आहे. याविषयीचा निर्णय त्यांचा असल्याचा टोला हाणत, आपण त्यात न पडलेलं बरं, अशी प्रतिक्रिया ठाकरे-शिंदेमधील कुरघोडीवर राज ठाकरे यांनी दिली.