मंत्रिमंडळाच्या बैठकीत गैरहजर राहण्यात गडाख आघाडीवर, शिंगणे, सामंत, केदार यांचीही अनेक बैठकांना दांडी

| Updated on: Mar 07, 2022 | 12:15 PM

मंत्रिपद मिळवण्यासाठी पक्ष श्रेष्ठीकडे जोरदार लॉबिंग करायचे, श्रेष्ठींना गळ घालायची, स्पर्धकांना मागे टाकण्यासाठी राजकीय डावपेच आखायचे आणि एकदा मंत्रिपद मिळाले की मग मंत्रिमंडळाच्या बैठकांना गैरहजर रहायचे हे वास्तव समोर आले आहे. अनेक मंत्री बैठकांना गैरहजर राहत असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत गैरहजर राहण्यात गडाख आघाडीवर, शिंगणे, सामंत, केदार यांचीही अनेक बैठकांना दांडी
Follow us on

मुंबई :  मंत्रिपद मिळवण्यासाठी पक्ष श्रेष्ठीकडे जोरदार लॉबिंग करायचे, श्रेष्ठींना गळ घालायची, स्पर्धकांना मागे टाकण्यासाठी राजकीय डावपेच आखायचे आणि एकदा मंत्रिपद मिळाले की मग मंत्रिमंडळाच्या बैठकांना गैरहजर रहायचे हे वास्तव समोर आले आहे, राज्यातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) मंत्र्यांच्या बाबतीत. मुख्यमंत्र्यांच्या आतापर्यंत बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकांना एकाही मंत्र्याने 100 टक्के हजेरी लावलेली नसून ‘दांडीबहाद्दर’ मंत्र्यांमध्ये शिवसेनेचे (shivsena) शंकरराव गडाख हे आघाडीवर असून त्यानंतर डॉ राजेंद्र शिंगणे, उदय सामंत, सुनील केदार, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, हसन मुश्रीफ, डॉ नितीन राऊत, विजय वडेट्टीवार यांचा नंबर लागतो.

एकूण 94 बैठका

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर 28 नोव्हेंबर 2019 रोजी पहिली मंत्रिमंडळ बैठक बोलावली. तेव्हापासून 23 डिसेंबर 2021 पर्यंत मंत्रिमंडळाच्या एकूण 94 बैठका झाल्या. त्यातील मंत्र्यांच्या उपस्थितीचा तपशील आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात मागवला होता. मुख्य सचिव कार्यालयाने अनिल गलगली यांना  बैठकीचा उपस्थित तक्ता दिला असून, यात आधीच्या 8 बैठकीत फक्त उद्धव ठाकरे, अजीत पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, डॉ नितीन राऊत, एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई हे 7 जणच मंत्रिमंडळात होते. त्यानंतर 86 बैठका झाल्या आहेत.

गडाख सर्वाधिक वेळा अनुपस्थित

94 पानांच्या तक्त्यात मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सर्वाधिक दांडी मारली असून, ते तब्बल 26 बैठकिंना गैरहजर राहिले . त्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे 21, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत 20, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार 20, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे 19, रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे 19, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ 16, माजी वन मंत्री संजय राठोड 16, ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत 15, भूकंप पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार 15,कृषी मंत्री दादाजी भुसे 13 व शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड या 13 बैठकीला गैरहजर राहिल्या आहेत. याबाबत बोलताना अनिल गलगली यांची म्हटले आहे की,  मंत्रिमंडळ बैठक महत्त्वाची असून आपापल्या विभागाचे प्रस्ताव मंजूर करुन घेत नागरिकांना दिलासा देण्याची संधी उपलब्ध असताना मंत्र्यांची गैरहजेरी नैतिकतेला धरुन नाही.

संबंधित बातम्या

वैराग्य दाखवून बगल में छुरी घेऊन फिरायचं, भाजप नेते गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर सणसणीत टीका!

VIDEO: दाऊद के दलालों को, जुते मारो… नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप विधानभवनाच्या पायरीवर

औरंगाबाद जिल्हा काँग्रेसची जम्बो कार्यकारीणी घोषित, कार्यकर्ते कमी अन् पदाधिकारी जास्त!