संजय शिरसाट यांना रुग्णालयातून डिसचार्ज, पण… डॉक्टरांनी दिला ‘हा’ सल्ला

| Updated on: Oct 21, 2022 | 1:46 PM

औरंगाबादचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना लीलावती रुग्णालयातून डिसचार्ज

संजय शिरसाट यांना रुग्णालयातून डिसचार्ज, पण... डॉक्टरांनी दिला हा सल्ला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गिरीश गायकवाड, मुंबईः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना रुग्णालयातून डिसचार्ज देण्यात आला आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) त्यांच्यावर उपचार सुरु होते. औरंगाबाद येथील आमदार संजय शिरसाट यांना सोमवारी म्हणजेच 17 ऑक्टोबर रोजी रात्री हृदयविकाराचा झटका आला होता. 18 ऑक्टोबर रोजी  त्यांना तातडीने मुंबईला रवाना करण्यात आले होते. आज शुक्रवारी 21 ऑक्टोबर रोजी त्यांना डिसचार्ज देण्यात आला आहे. मात्र डॉक्टरांनी त्यांना एक आठवडाभर आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

लीलावती रुग्णालयातून बाहेर पडताना आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. या सगळ्या दरम्यान मुख्यमंत्र्यांपासून इतर सर्व नेते ज्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली, त्या सगळ्यांचे मी मनापासून आभारी आहे. आता घरी जात आहे, असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं.

डॉक्टरांनी त्यांना आठवडाभर आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मी काही काळ आराम करून लवकरच दोन ते तीन दिवसात कामाला सुरुवात करेन, असं वक्तव्य शिरसाट यांनी केलंय.

लीलावती रुग्णालयात असताना संजय शिरसाट यांची पोस्ट-

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांना सोमवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला होता. शहरातील सिग्मा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने त्यांना तत्काळ एअर अँब्युलन्सने मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

लीलावती रुग्णालयात उपचार घेत असताना संजय शिरसाट यांची अनेक नेत्यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील शिरसाट यांना भेट दिली होती.