AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अश्लील व्हिडिओ पाहण्यात गुंग, अचानक समोर स्वत:चाच व्हिडिओ, गर्लफ्रेंडसोबत… तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली!

इंटरनेटवर अश्लील व्हिडिओ शोधणाऱ्या एका व्यक्तीला मोठा धक्का बसला, जेव्हा त्याच्यासमोर स्वतःचाच व्हिडिओ आला. यामुळे त्याची झोप उडाली आहे.

अश्लील व्हिडिओ पाहण्यात गुंग, अचानक समोर स्वत:चाच व्हिडिओ, गर्लफ्रेंडसोबत... तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली!
VideoImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 07, 2026 | 5:49 PM
Share

जगभरातील अनेकजण इंटरनेटवर अश्लील व्हिडिओ पाहत असतात. अशातच आता इंटरनेटवर असेच अश्लील व्हिडिओ शोधणाऱ्या एका व्यक्तीला मोठा धक्का बसला, जेव्हा त्याच्यासमोर स्वतःचाच व्हिडिओ आला. ही घटना हाँगकाँगमधील एरिक नावाच्या व्यक्तीसोबत घडला आहे. त्यामुळे त्याची झोप उडाली. एरिक 2023 मध्ये आपल्या गर्लफ्रेंडसोबत चीनला गेला होता. त्यावेळी त्यांनी एका हॉटेलमध्ये मुक्काम केला होता, याच रूममधील व्हिडिओ एका सिक्रेट कॅमेऱ्याच्या सहाय्याने रेकॉर्ड करण्यात आला होता. त्यानंतर तो इंटरनेटवर अपलोड करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

व्हिडिओ मध्ये काय आहे?

एरिकला इंटरनेटवर आढळलेल्या व्हिडिओमध्ये एरिक त्याच्या प्रेयसीसोबत रूमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. यानंतर दोघे त्यांच्या बॅगा खाली ठेवतात आणि एकमेकांच्या जवळ येतात. या दोघांनाही माहिती नाही की हॉटेलच्या खोलीत असलेला एक छुपा कॅमेरा त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ या दोघांच्या संमतीशिवाय इंटरनेटवर अपलोड करण्यात आला आहे. त्यानंतर जगभरातील हजारो लोकांनी त्यांचा हा व्हिडिओ पाहिला आहे.

एरिक काय म्हणाला?

एरिकने यावर बोलताना म्हटले की हा अनुभव अत्यंत भयानक होता. जेव्हा मी पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहिला तेव्हा मला विश्वास बसत नव्हता. जेव्हा मी माझ्या प्रेयसीला याबाबत सांगितले तेव्हा तिला वाटले की मी मस्करी करत आहे. पण जेव्हा तिने स्वतः व्हिडिओ पाहिला तेव्हा ती घाबरली. तिला भीती वाटत होती की तिच्या ओळखीच्या मित्रांनी, कुटुंबातील लोकांनी, नातेवाईकांनी आणि सहकाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या जोडप्याची झोप उडाली. या दोघांनी ओळख लपवण्यासाठी आपला पेहराव बदलण्याचाही प्रयत्न केला.

एरिकने घेतला मोठा निर्णय

एरिकने या घटनेनंतर मोठा निर्णय घेतला आहे. त्याने आता अशी सामग्री पाहणे बंद केले आहे, तसेच त्याने आता इंटरनेटवर अश्लील व्हिडिओ शोध आणि या वेबसाइटना भेट देणे देखील बंद केले आहे. मात्र तो आपला व्हिडिओ तिथे आहे की नाही हे चेक करत असतो. महत्त्वाची बाब म्हणजे स्पायकॅम पॉर्न चीनमध्ये दहा वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहे. मात्र या देशात पोर्नोग्राफिक सामग्री तयार करणे आणि शेअर करणे बेकायदेशीर आहे. त्याचमुळे असे व्हिडिओ हॉटेलमध्ये गुप्तपणे रेकॉर्ड केले जातात.

Follow Us
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा