CM Eknath Shinde | चंद्रकांत पाटलांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले संजय सिरसाट?

| Updated on: Jul 23, 2022 | 6:07 PM

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आहेत, हे अजूनही अंगवळणी पडत नसल्याचं वक्तव्य अनिल बोंडे यांनीही केलं आहे. यावर एकनाथ शिंदे गटातून आता प्रतिक्रिया आली आहे.

CM Eknath Shinde | चंद्रकांत पाटलांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले संजय सिरसाट?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः मनावर दगड ठेवून भाजप नेत्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री केलं, हे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचं वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आहेत, हे अजूनही अंगवळणी पडत नसल्याचं वक्तव्य अनिल बोंडे यांनीही केलं आहे. यावर एकनाथ शिंदे गटातून आता प्रतिक्रिया आली आहे. औरंगाबादमधून शिंदे यांच्या गटात गेलेले आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिला आहे. चंद्रकांत पाटील हे त्यांच्या मनातील भावना बोलले असतील. भाजप कार्यकर्त्यांना असं वाटतही असेल.. पण अखेरचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी घेतलाय. कार्यकर्त्यांना वाटत असेल तर त्यात गैर नाही. पक्ष श्रेष्ठींनी निर्णय गेतल्यानंतर त्यात काहीही अडचण येणार नाही. मतभेदही होणार नाही, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहें.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य चांगलंच वादात सापडलं आहे. कार्यकर्त्यांशी बोलताना ते म्हणाले, गेल्या अडीच वर्षांत राज्या सरकारचा कारभार पाहता सत्ता बदल करण्याची गरज होती. आता सत्तेत बदल झालाय तर जनतेला चांगला संदेश देणारा नेता हवा. त्यामुळे चांगल्या निर्णयांना स्थिरता प्राप्त होईल. असे असूनही आपण आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला तर देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे भाजप नेत्यांच्या मनात यावरून नाराजी असल्याचे दिसून येते.

‘उप’ लिहायचंच विसरून जातं- अनिल बोंडे

भाजप खासदार अनिल बोंडे यांनीही अशाच प्रकारे प्रतिक्रिया दिली. मी अनेकदा मेसेज करताना मुख्यमंत्री महोदय, असेच लिहितो. उप लिहियाचंच राहून जातं. पण जनतेची ती भावना आहे. राज्यात आजही देवेंद्र फडणवीस यांचं एककलमी नेतृत्व आहे असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलं.

शरद पवारांची काय प्रतिक्रिया?

भाजप नेत्यांनी मनावर दगड ठेवत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं, या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. मात्र बोलता बोलता त्यांनी एक टोला मारला. त्यांनी मनावर दगड ठेवला, छातीवर ठेवलाय की डोक्यावर ठेवलाय.. हे त्यांनाच माहिती. हा त्यांच्या पक्षांतर्गत मुद्दा आहे, असं खोचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं.