महाविकासआघाडीने पुण्यात आजोबांना पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिलीय; मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरेंची टीका

| Updated on: Nov 24, 2020 | 9:43 PM

रुपाली पाटील यांनी महाविकास आघाडी आणि भाजपच्या उमेदवारावर निशाणा साधला (Rupali Patil slams BJP and Maha Vikas aghadi candidate).

महाविकासआघाडीने पुण्यात आजोबांना पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिलीय; मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरेंची टीका
Follow us on

सांगली : “महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार हे आजोबा आहेत. कारण त्यांचे वय 75 वर्ष आहे. तर भाजपचे उमेदवार म्हणजे बुडीत कारखानदार आहेत. कारण त्यांनी अनेक शेतकऱ्यांचे पैसे बुडविले आहेत. ज्यांना पदवीधरांचे ज्ञान नाही, अशा नेत्यांनी या लोकांना उमेदवारी देणे म्हणजे पदवीधरांचा अपमान आहे”, असा घणाघात पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला (Rupali Patil slams BJP and Maha Vikas aghadi candidate).

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्ताने सांगलीत मनसेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात रुपाली पाटील यांनी महाविकास आघाडी आणि भाजप उमेदवारावर निशाणा साधला (Rupali Patil slams BJP and Maha Vikas aghadi candidate).

“विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. या निवडणुकीत कारखानदार आणि शिक्षण सम्राट हे उमेदवार आहेत. त्यांनी कधीच पदवीधरांचे प्रश्न सोडविले नाहीत”, अशी घणाघाती टीका रुपाली पाटील यांनी केली.

दरम्यान, रुपाली पाटील यांना साताऱ्यातून अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी रुपाली पाटील यांनी पुणे पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणावर देखील रुपाली पाटील यांनी भाष्य केलं. “मला धमकी दिलेल्या आरोपीला लवकर पकडा. अन्यथा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला पकडून मारलं तर आमची जबाबदारी राहणार नाही”, असा इशारा रुपाली पाटील यांनी दिला.

कोण आहेत रुपाली पाटील?

पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून रुपाली पाटील यांनी काम पाहिले आहे. सध्या त्या मनसेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. मनसेच्या आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. महिला, युवक-युवतींच्या प्रश्नांवर त्यांचं विशेष काम आहे. स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यामध्ये त्यांनी तुरुंगवास देखील भोगला आहे. त्या उच्चशिक्षित असून त्यांचे शिक्षण बी.कॉम LLB झाले आहे. त्या व्हॉलीबॉल आणि शुटिंग व्हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू राहिल्या आहेत.

पुण्यातील मनसेचा आक्रमक आवाज

पुणे शहरातील मनसेचा आक्रमक आवाज म्हणून रुपाली पाटील यांची ओळख आहे. पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्वसामान्यांची बाजू घेऊन त्या सातत्याने भांडत असतात. कोव्हिड काळात देखील अनेक रुग्णालयांना भेटी देऊन तेथील गैरप्रकार त्यांनी उघडे पाडले होते. सर्वसामान्यांचा आवाज म्हणून त्या सासत्याने भूमिका घेत असतात.

संबंधित बातम्या :

पदवीधर निवडणुकीसाठी माझा फोटो वापरु नका; संभाजीराजेंचा उमेदवारांना इशारा