AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिद्धिविनायक दर्शनावेळी राज ठाकरेंचा ‘मसल मॅन’ सोबतीला, कंगनाला मनसेचा छुपा पाठिंबा?

मंंगळवारी (39 डिसेंबर) सिद्धिवीनायकाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत आल्यानंतर तिच्या दिमतीला मनसेचे पदाधिकारी होते. त्यामुळे कंगना आणि मनसेचा काय संबंध?, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. (MNS and Kangana Ranaut)

सिद्धिविनायक दर्शनावेळी  राज ठाकरेंचा 'मसल मॅन' सोबतीला, कंगनाला मनसेचा छुपा पाठिंबा?
| Updated on: Dec 30, 2020 | 2:11 PM
Share

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि शिवसेना (shivsena) वाद सर्वश्रुत आहे. मला मुंबईत येण्यापासून कोण रोखतं असं म्हणत तिने यापूर्वी मुंबईत दिमाखात प्रवेश केला होता. यावेळी तिला दिल्या गेलेल्या सुरक्षेची देशभरात चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर कंगना मंंगळवारी (29 डिसेंबर) सिद्धिवीनायकाचे दर्शन घेण्यासाठी पुन्हा मुंबईत आली. यावेळी तिच्या दिमतीला मनसेचे (MNS) पदाधिकारी होते. त्यामुळे कंगना आणि मनसेचा काय संबंध?, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. या पार्श्वभूमीवर कंगनाला मनसेकडून छुपं सरक्षण दिलं जात  असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (MNS giving protection to actress Kangana Ranaut in Mumbai)

कंगनाच्या मुंबई वारीला मनसेचे छुपे संरक्षण?

कंगना रनौत मंगळावारी (29 डिसेंबर) सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत आली होती. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, असे सांगत कंगनाने शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला होता. यावेळी तिच्यासोबत मनसेचे पदाधिकारी होते. मनसेचे आंबोली विधानसभा मतदारसंघाचे विभाग अध्यक्ष मनीष धुरी आणि त्यांचे बंधू कुशल धुरी कंगना रनौतसोबत होते. कंगनाने सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना दोन्ही धुरी बंधू तिच्यासोबत असल्यामुळे मनसेकूडन कंगनाला छुपं संरक्षण दिलं जात असल्याचं बोललं जात आहे.

मनीष धुरी राज ठाकरेंचे निकटवर्तीय

मनीष धुरी हे मनसेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. ते मनसेचे आंबोली विधानसभा मतदारसंघाचे विभाग अध्यक्ष आहेत. तसेच ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवटवर्तीय असल्याचे मानले जाते. त्यांची मनसेत ‘मसल मॅन’ म्हणून ओळख आहे. मनसेकडून राबवण्यात येणाऱ्या खळ्ळखट्याक आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. हेच मनीष धुरी कंगना रनौत मंगळवारी मुंबईत आली असाताना दर्शनासाठी तिच्यासोबत होते. दरम्यान, याबाबत बोलताना कंगना रनौत यांच्याशी माझा अनेक वर्षांपासून कौटुंबिक स्नेह असल्याचं सांगितलं आहे.

कंगना सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

अभिनेत्री कंगना रनौतने मंगळवारी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी कंगना हिरवी साडी, नाकात नथ आणि केसात माळलेला गजरा अशा पारंपारिक मराठमोळ्या वेषात आली होती. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर कंगना रानौतने मोठ्या उत्साहात हसतखेळत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, असे सांगत कंगनाने शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला. यावेळी मनसेचे मनीष धुरी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

“मुंबईत परत पाऊल ठेवू नकोस” संजय राऊतांनी उघड धमकी दिल्याचा कंगनाचा गंभीर आरोप

आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, निलेश राणेंनी कंगनाला बजावले

बेईमानीने वागणाऱ्यांनी शिवसेनेच्या वाकड्यात शिरु नये, तुमच्या घरावर फेकायला आमच्याकडे खूप दगड आहेत; राऊतांचा कंगनाला इशारा

(MNS giving protection to actress Kangana Ranaut in Mumbai)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.