“मुंबईत परत पाऊल ठेवू नकोस” संजय राऊतांनी उघड धमकी दिल्याचा कंगनाचा गंभीर आरोप

ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे? असा प्रश्न कंगनाने उपस्थित केला (Actress Kangana Ranaut Reply to Sanjay Raut) आहे.

मुंबईत परत पाऊल ठेवू नकोस संजय राऊतांनी उघड धमकी दिल्याचा कंगनाचा गंभीर आरोप
पालिकेने अनधिकृतपणे माझे घर उद्ध्वस्त केले, तेव्हा मी रडले होते.
Follow us
| Updated on: Sep 03, 2020 | 2:52 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोपांची मालिका अद्याप सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला उघड धमकी दिली असा गंभीर आरोप अभिनेत्री कंगना रनौतने केला आहे. मुंबईत भीती वाटत असेल तर परत येऊ नये, असा इशारा राऊतांनी दिल्याचा दावा कंगनाने केला आहे. मला मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी कंगनाने केले होते. (Actress Kangana Ranaut Reply to Sanjay Raut)

“शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा परतू नये असं म्हटलं होतं. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे? असा प्रश्न कंगनाने उपस्थित केला आहे.

यावर संजय राऊत  ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलिसांकडे पुरावे द्यावेत, असा टोला कंगना रनौतला लगावला आहे.

हेही वाचा – मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती, केंद्र सरकारने सुरक्षा द्यावी : कंगना

“माझ्या काळजीसाठी धन्यवाद, बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी”, असं कंगना रनौत म्हणाली होती.

(Actress Kangana Ranaut Reply to Sanjay Raut)

संजय राऊतांची प्रतिक्रिया

कंगनाच्या या ट्विटनंतर संजय राऊतांनी तिला धारेवर धरलं होतं. “जर महाराष्ट्रातील व्यक्ती हिमाचल प्रदेशमध्ये राहत असेल आणि ती व्यक्त जर असं म्हणत असेल की माझा शिमला पोलिसांवर विश्वास नाही. जर विश्वासच नाही, तर शिमलामध्ये राहू नको, असे संजय राऊतांनी सांगितले.

तुम्ही तिथं राहता, खाता, कमवता, ओळख मिळवता आणि शिमला पोलिसांवर थुंकता. मग हा काय तमाशा आहे. जर मी या राज्यात राहतो, तर माझा अधिकार आहे, पोलिसांसोबत संवाद ठेवण्याचा, असेही राऊत म्हणाले.

जर मला काही समस्या असेल तर त्यांना सांगेल. कुणीही व्यक्ती मुंबई पोलीस, राज्य सरकार यांच्याविषयी बोलते. हे बरोबर नाही. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना आवाहन करतो की, जे लोक मुंबई पोलिसांविषयी वाईट बोलत आहेत आणि राज्यातील जे राजकीय पक्ष अशा व्यक्तींचं समर्थन करत आहेत, अशांविरुद्ध कारवाई करावी,” असं राऊत म्हणाले होते.

संबंधित बातम्या :  

मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या कामाची पद्धत एकच, उद्धव ठाकरेंनी प्रोटोकॉल का तोडावा? : संजय राऊत

आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, निलेश राणेंनी कंगनाला बजावले

(Actress Kangana Ranaut Reply to Sanjay Raut)

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.