मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती, केंद्र सरकारने सुरक्षा द्यावी : कंगना रनौत

मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती, केंद्र सरकारने सुरक्षा द्यावी : कंगना रनौत

बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते, असं अभिनेत्री कंगना रनौत (Actress Kangana Ranaut) ट्विटरवर म्हणाली आहे.

चेतन पाटील

|

Aug 30, 2020 | 9:39 PM

मुंबई : बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते, असं अभिनेत्री कंगना रनौत (Actress Kangana Ranaut) ट्विटरवर म्हणाली आहे. भाजप प्रवक्ते राम कदम यांच्या ट्विटला प्रतिक्रिया देताना कंगना रनौतने मुंबई पोलिसांबाबत वक्तव्य केलं.

राम कदम यांनी कंगना रनौतला सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र पाठवले आहे. त्यानंतर त्यांनी ट्विटरवरही याबाबत मागणी केली. “अभिनेत्री कंगना रनौत बॉलिवूड आणि ड्रग्ज माफियांविषयी माहिती देण्यास तयार आहे. मात्र. यासाठी तिला सुरक्षा देणं जरुरीचं आहे. दुर्देवं म्हणजे महाराष्ट्र सरकारने अजूनही तिला सुरक्षा दिलेली नाही”, असं राम कदम ट्विटरवर म्हणाले.

राम कदम यांच्या या ट्विटला कंगनाने उत्तर दिलं. “माझ्या काळजीसाठी धन्यवाद, बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी”, असं कंगना रनौत (Actress Kangana Ranaut) म्हणाली.

कंगनाच्या प्रतिक्रियेनंतर राम कदम यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत महाराष्ट्र सरकारवर टीका केली. “अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हस्तक्षेप करुन महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलिसांच्या सक्षम प्रतिमेला मलीन केलं आहे. काही मोठ्या लोकांना वाचवण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे, असं आता जगासमोर आलं आहे. महाराष्ट्र सरकार कंगनाशी चर्चा करुन तिचा विश्वास पुन्हा संपादित करु शकेल? हा प्रश्न आहे”, अशी टीका राम कदम यांनी केली.

संबंधित बातमी :

कंगना ड्रग्जशी संबंधित नेते-अभिनेत्यांची नावे सांगण्यास तयार, सरकारकडून सुरक्षा का नाही? : राम कदम

संबंधित व्हिडीओ :


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें