सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर कंगना रनौत म्हणाली जय महाराष्ट्र

सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर कंगना रानौतने मोठ्या उत्साहात हसतखेळत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. | Kangna Ranaut

सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर कंगना रनौत म्हणाली जय महाराष्ट्र
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 7:09 AM

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेसोबतच्या (Shivsena) वादामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या अभिनेत्री कंगना रनौत (Kangna Ranaut) हिने मंगळवारी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी कंगना हिरवी साडी, नाकात नथ आणि केसात माळलेला गजरा अशा पारंपारिक मराठमोळ्या वेषात आली होती. (Kangana Ranaut visit Siddhivinayak temple in Mumbai)

सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर कंगना रानौतने मोठ्या उत्साहात हसतखेळत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, असे सांगत कंगनाने शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला.

यावेळी प्रसारमाध्यमांनी तिला संजय राऊत यांच्या पत्नीला आलेल्या ईडीच्या नोटीसविषयी विचारणा केली. तुम्हाला मुंबईत परवानगी नाकारणाऱ्यांना ईडीची नोटीस आली त्याबद्दल काय वाटते, असे कंगनाला विचारण्यात आले. मात्र, कंगना रानौतने त्यावर बोलायचे टाळले.

काही दिवसांपूर्वी मुंबईला POK म्हटल्याने कंगना रनौत प्रचंड चर्चेत आली होती. त्यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला फटकारले होते. यानंतर कंगना आणि संजय राऊत यांच्यात ट्विटवर वॉर झाले होते. मध्यंतरीच्या काळात मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या वांद्रे पश्चिम येथील कार्यालय तोडले होते. त्यावरूनही बराच गदारोळ झाला होता. त्यानंतर कंगना हिमाचल प्रदेशमध्ये होती.

अखेर रविवारी कंगना पुन्हा मुंबईत परतली होती. सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात कंगना आणि तिच्या कुटुंबातील काही सदस्य रविवारी मुंबई विमानतळावर दाखल झाले होते.

‘बेईमानीने वागणाऱ्यांनी शिवसेनेच्या वाकड्यात शिरु नये, तुमच्या घरावर फेकायला आमच्याकडे खूप दगड आहेत’

संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी ‘शट अप या कुणाल’ (Shut up Ya kunal) या कार्यक्रमात कंगनाला अप्रत्यक्ष इशारा दिला होता. ‘शीशे के घरों में रहने वाले दूसरों के घरों पर पत्थर नहीं फ़ेंकते’, या डायलॉग सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. तुम्ही चूक केली असेल, अप्रमाणिकपणे वागला असाल तर शांत बसण्यातच शहाणपण आहे. अन्यथा शिवसेनेकडे तुमच्या घरावर फेकण्यासाठी खूप दगड आहेत, असा गर्भित इशाराही संजय राऊत यांनी दिला होता.

संबंधित बातम्या:

“मुंबईत परत पाऊल ठेवू नकोस” संजय राऊतांनी उघड धमकी दिल्याचा कंगनाचा गंभीर आरोप

आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, निलेश राणेंनी कंगनाला बजावले

बेईमानीने वागणाऱ्यांनी शिवसेनेच्या वाकड्यात शिरु नये, तुमच्या घरावर फेकायला आमच्याकडे खूप दगड आहेत; राऊतांचा कंगनाला इशारा

(Kangana Ranaut visit Siddhivinayak temple in Mumbai)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.