आयुक्त बदलून पाहिले, आता पालकमंत्री बदलून पाहा : मनसे

| Updated on: Jul 15, 2020 | 2:41 PM

सगळे प्रयोग करुन पण कोरोना नियंत्रणात येत नसेल, तर एकदा पालकमंत्री पण बदलून बघा.." असे ट्वीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केले

आयुक्त बदलून पाहिले, आता पालकमंत्री बदलून पाहा : मनसे
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबईत अण्णासाहेब मिसाळ यांची स्थगित बदली रद्द करत त्यांच्या जागी नागपूरचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र आयुक्त बदलीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापायला लागलं आहे. नवी मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलून पाहा, असा खोचक टोला मनसेने लगावला आहे. (MNS asks to change Guardian Minister of Thane Eknath Shinde)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी चक्क पालकमंत्री बदलीची मागणी केली आहे. “आयुक्त बदलून पाहिले, तसेच पालकमंत्री बदलून पाहा” असं ट्विट गजानन काळे यांनी केलं आहे.

काय आहे गजानन काळे यांचे ट्वीट?

“ठाणे जिल्ह्यातील चार महापालिका आयुक्त बदलले. त्याचवेळी नवी मुंबई पालिकेचे तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांचीही बदली झाली होती. मग परत दोन दिवसात बदली रद्द झाली, तर आज परत मिसाळ यांची बदली होऊन नवीन आयुक्तपदी अभिजित बांगर यांना आणले. सगळे प्रयोग करुन पण कोरोना नियंत्रणात येत नसेल, तर एकदा पालकमंत्री पण बदलून बघा..” असे ट्वीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केले आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

“यांचं राजकारण तर लोकांचं रोजच मरण..
नुसतं धारावी पॅटर्न च्या नावाने ऊर बडवून घ्या..
नवी मुंबईकर स्वत:ची काळजी स्वत: घे रे बाबा..
राम भरोसे कारभार सुरु आहे सगळा..” असेही गजानन काळे यांनी लिहिले आहे.

याआधी गजानन काळे यांनी महात्मा फुले आरोग्य योजनेवरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर आरोप केले होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेला 1 लाख 20 हजार रुग्णांना मोफत उपचार दिल्याचा दावा खोटा आहे, खोटी माहिती देणाऱ्या आरोग्य मंत्र्यांनी जनतेची माफी मागून राजीनामा देण्याची मागणी गजानन काळे यांनी केली होती.

संबंधित बातमी :

मिसाळ यांच्या बदलीची स्थगिती मागे, बांगर नवी मुंबई पालिका आयुक्त

(MNS asks to change Guardian Minister of Thane Eknath Shinde)