ठरलं! राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार, आज संध्याकाळी ‘वर्षा’वर जाणार

राज ठाकरे वर्षा बंगल्यावर जात शिंदेंची भेट घेणार आहेत. गणेशोत्सव सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री निवासस्थानच्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे जाणार आहेत.

ठरलं! राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार, आज संध्याकाळी वर्षावर जाणार
| Updated on: Sep 06, 2022 | 11:55 AM

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या वरचेवर होणाऱ्या भेटी मनसे-भाजप युतीचं द्योतक ठरत आहेत. अश्यात युतीचा महत्वपूर्ण भाग असलेले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज ठाकरे यांचीही जवळीक वाढत आहे. याआधी मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या शीवतीर्थ या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. आता राज ठाकरे वर्षा बंगल्यावर जात शिंदेंची भेट घेणार आहेत. गणेशोत्सव सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री निवासस्थानच्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे जाणार आहेत.

युतीची चिन्हे

सध्या राज ठाकरे-शिंदे-फडणवीस यांच्यातील वाढती जवळीक पाहता युतीची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई महापालिका निवडुकीच्या तोंडावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही युती होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.