मोठा ट्विस्ट, ओमराजे निंबाळकर पुन्हा ठाकरे सेनेत येणार? खटल्याचा निकाल लागताच ओमराजे यांची मोठी प्रतिक्रिया
खासदरार ओमराजे निंबाळकर यांनी सध्या सुरु असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी येत्या काळात शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार का? यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 9 खासदारांपैकी 6 खासदार हे बंडखोरी करण्याच्या मार्गावर आहेत. ठाकरे गटाने व्हीप जारी करुन तातडीने बैठक बोलावली होती. या बैठकीला देखील 6 खासदारांनी दांडी मारली. या खासदारांपैकी एक असलेल्या ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना शिंदे गटात जाण्याचा अद्याप कोणता राजकीय निर्णय घेतलेला नाही. मतदार संघात जाऊन चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेणार असल्याचे ओमराजे निंबळकर यांनी म्हटले आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us