मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी तब्बल तीन तास उद्धव ठाकरे यांच्या घरी

देशातील एका बड्या उद्योगपतीचा मुलगा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी आल्याने या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी तब्बल तीन तास उद्धव ठाकरे यांच्या घरी
vanita kamble | Updated on: Oct 22, 2022 | 9:22 AM

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे तीन दिग्गज नेते शुक्रवारी एकत्र आले. दिवाळीत झालेल्या या राजकीय धमाक्याची चर्चा सुरु असतानाच तिकडे मातोश्रीवर मोठी घडामोड घडली. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी मातोश्रीवर आले होते. अनंत अंबानी तब्बल तीन तासानंतर मातोश्रीवरुन बाहेर पडले. या भेटीचा तपशील समोर आलेला नाही.

शुक्रवारी रात्री मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर आले होते. यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.  यांच्यात काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेले नाही.

रात्री 8 वाजून 20 मिनिटानी अनंत अंबानी यांना ताफा मातोश्री वर दाखल झाला. रात्री 11.30 वाजताच्या सुमारास अंबानी मातोश्रीवरुन बाहेर पडले.

अंबानी आणि ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा सुरू होती हे मात्र गुलदस्त्यात आहे. मात्र, देशातील एका बड्या उद्योगपतीचा मुलगा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी आल्याने या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us