सलमान खानची हिरोईन मुंबई काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी

| Updated on: Mar 15, 2021 | 2:14 PM

ज्येष्ठ उपाध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावरील 21 जणांमध्ये नगमा या एकमेव महिला पदाधिकारी आहेत. (Mumbai Congress Vice President Nagma )

सलमान खानची हिरोईन मुंबई काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी
काँग्रेस नेत्या आणि अभिनेत्री नगमा
Follow us on

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2022) पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. सहा ज्येष्ठ उपाध्यक्ष, 15 उपाध्यक्ष, 42 महासचिव, 76 सचिव अशा पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा (Nagma) यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी नगमा मोरारजी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नगमा यांनी सलमान खान, अमिताभ बच्चनसह अनेक मोठ्या अभिनेत्यांसह चित्रपटात भूमिका केल्या आहेत. (Mumbai Congress Vice President Actress Nagma Executive committee BMC Elections)

मुंबई महापालिका निवडणुकांना काँग्रेस स्वबळावर सामोरी जाणार आहे. त्यामुळे सामूहिक नेतृत्व सोपवत सर्व गटांना खुश करण्याचा प्रयत्न काँग्रेस करताना दिसत आहे. ज्येष्ठ उपाध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावरील 21 जणांमध्ये नगमा या एकमेव महिला पदाधिकारी आहेत.

कोण आहेत नगमा?

51 वर्षीय नगमा यांनी दाक्षिणात्य चित्रपटांसह बॉलिवूड आणि मराठी सिनेमातही काम केले आहे. 1990 मध्ये सलमान खानसोबत बागी सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पाय ठेवला. सुहाग, बागी, लाल बादशाह, कुवारा, अब तुम्हारे हवाले वतन साथियों अशा काही हिंदी सिनेमात त्या झळकल्या आहेत.

मराठी चित्रपटातही भूमिका

तेलुगू, तमिळ, भोजपुरी, मल्ल्याळम, पंजाबी, कन्नड, बंगाली अशा बऱ्याच भाषांमधील चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. 2007 मध्ये थांब लक्ष्मी थांब या मराठी सिनेमात त्या झळकल्या होत्या. गेल्या दहा-बारा वर्षात त्यांचे मोठ्या पडद्यावर दर्शन झालेले नाही.

भाजप प्रवेशाची चर्चा, काँग्रेसमध्ये एन्ट्री

2004 मधील लोकसभा निवडणुकीत हैदराबाद मतदारसंघातून नगमा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा भाजपचा इरादा होता. पण त्यांनी काँग्रेसमधून राजकारणात प्रवेश केला. आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी प्रचार केला. राजीव गांधी यांच्या प्रेरणेतून आपण काँग्रेसप्रवेशाचा निर्णय घेतल्याचं नगमा यांनी सांगितलं होतं.

लोकसभा निवडणुकीत दणकून पराभव

2014 मध्ये उत्तर प्रदेशातील मेरठ मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली. मात्र त्या चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं. 2015 मध्ये अ. भा. महिला काँग्रेसच्या महासचिवपदी नगमा यांची वर्णी लागली. गेल्या 17 वर्षांपासून नगमा काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांमध्येही नगमा यांचा समावेश होता.

मुंबई काँग्रेस कार्यकारिणीत कोण कोण?

ज्येष्ठ उपाध्यक्ष

मधू चव्हाण
बाबा सिद्दीकी
वीरेंद्र बक्षी
जेनेट डिसुझा
गणेश यादवी
शिवजी सिंह

(Mumbai Congress Vice President Actress Nagma Executive committee BMC Elections)

उपाध्यक्ष

अशोक सुतराळे
नगमा मोरारजी
युसुफ अब्राहनी
दिनेश हेगडे
जॉर्ज अब्राहम
मोहम्मद शरीफ खान
जयप्रकाश सिंह
मोहसीन हैदर
वीरेंद्र उपाध्याय
धर्मेश व्यास
अर्जुन सिंह
गोविंद सिंह
जुनैद पटेल
प्रवीण नाईक
प्रणिल नायर

गेल्या वर्षी 19 डिसेंबरला आमदार भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यासोबत चरणसिंग सप्रा यांना कार्यकारी अध्यक्षपद बहाल केले गेले. याशिवाय, एक प्रभारी, चार समित्या आणि नऊ सदस्यांची नियुक्ती करत सामूहिक नेतृत्वाचा प्रयोग सुरू झाला. नव्या अध्यक्षांच्या कार्यकारिणीची दिल्लीतून घोषणा झाली होती.

संंबंधित बातम्या :

महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी काँग्रेसचे 40 स्टार प्रचारक घोषित

“कंगनाचे अख्खे करिअर कंपूशाहीवर आधारित” नगमाच्या आरोपांनंतर सोशल मीडियावर जुगलबंदी

मुंबई काँग्रेसकडून गटातटांची खुशामत, कार्यकारिणीत 15 उपाध्यक्ष, 42 महासचिव, 76 सचिव

(Mumbai Congress Vice President Actress Nagma Executive committee BMC Elections)