
मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) मागील निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढले होते. यावेळी यावेळी महाविकास आघाडी सरकार असल्याने ते एकत्र लढणार की स्वतंत्र हे पाहावे लागणार आहे. मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 112मध्ये (Ward 112) 2017ला तब्बल सात उमेदवार उभे राहिले होते. भाजपा, काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेड आणि अपक्ष अशा सात पक्षांनी आपले उमेदवार दिले. यात भाजपाने (Bharatiya Janata Party) बाजी मारली होती. प्रमुख टक्कर ही भाजपा, शिवसेना यांच्यातच पाहायला मिळाली. भाजपाला सात हजारांवर तर शिवसेनेला पाच हजारांवर मते मिळाली. सात उमेदवारांमुळे मतांची विभागणी झालेली पाहायला मिळाली. एकूण वैध मते ही वीस हजार 855 इतकी होती. सर्वाधिक मते भाजपा तर सर्वात कमी मते संभाजी ब्रिगेडला मिळाली होती. केवळ 88 मते संभाजी ब्रिगेडच्या पारड्यात पडली होती.
सात पक्षांचे उमेदवार या वॉर्डात पाहायला मिळाले होते. यात भाजपाकडून साक्षी दीपक दळवी, मनसेतर्फे सुप्रिया सुजय धुरत, राष्ट्रवादीकडून रुचिरा राजेंद्र मोकल, शिवसेनेकडून जयश्री जयवंत पाटील, अपक्ष रशीदा गुलाब शेख, संभाजी ब्रिगेडकडून विद्या मनोहर शिंदे तर काँग्रेसतर्फे अबोली बिपिंद्र विचारे यांनी आपले नशीब आजमावले होते.
– साक्षी दीपक दळवी – 7691
– सुप्रिया सुजय धुरत – 1492
– रुचिरा राजेंद्र मोकल – 2970
– जयश्री जयवंत पाटील – 5845
– रशीदा गुलाब शेख – 129
– विद्या मनोहर शिंदे – 88
– अबोली बिपिंद्र विचारे – 2122
| पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
|---|---|---|
| शिवसेना | निधी प्रमोद शिंदे | 4,485 मतं |
| भाजप | रुक्मिणी विठ्ठल खरटमोल | 3,256 मतं |
| काँग्रेस | उषा अनिल कांबळे | 1,333 मतं |
| राष्ट्रवादी | रेशा मधुकर शिससाट | 1,716 मतं |
| मनसे | शोभा अशोक शानभाग | 1,009 मतं |
| अपक्ष/ इतर |
भाजपाचे वर्चस्व या वॉर्डात दिसून येते. साक्षी दळवी यांनी याठिकाणी शिवसेनेच्या जयश्री पाटलांना पराभूत केले. जयश्री पाटील यांनीही आव्हान निर्माण केले होते. मात्र दीड हजारांहून अधिक मतांनी त्यांचा पराभव झाला. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी राहिली.
भांडुप, तानसा पाइपलाइन, निर्मल नगर, जयदेवसिंग नगर, पंजाबी कॉलनी, राम नगर, आंबेडकर नगर, एमएमआरडीए कॉलनी हे महत्त्वाचे भाग या वॉर्डात येतात.