
मुंबई : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा भाजप (BJP), शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात भाजप प्रणित जे ईडी सरकार आलं ते सवैधानिक व्यवस्थेला धरून नाही. महाराष्ट्रात असवैधानिक सरकार आहे. अमरावतीतच नाही तर महाराष्ट्रात सर्वत्र खदखद दिसत आहे. अंतर्गत खदखद सुरू झाल्यामुळे शिंदे -फडणवीस सरकारचा अंत लवकरच असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.
नाना पटोले यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बच्चू कडू, रवी राणा यांच्या वादावर प्रतिक्रिया देताना त्यांनी जोरदार टोला लगावला. महाराष्ट्रात भाजप प्रणित जे ईडी सरकार आलं ते सवैधानिक व्यवस्थेला धरून नाही. महाराष्ट्रात असवैधानिक सरकार आहे. अमरावतीतच नाही तर सर्वत्र अशीच खदखद दिसून येत आहे. अंतर्गत खदखदीमुळ शिंदे -फडणवीस सरकारचा अंत लवकरच होणार असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.
सध्या बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद चांगालाच चर्चेचा विषय ठरला आहे. या वादावरून विरोधकांनी शिंदे गटावर टीकेची झोड उठवली आहे. कोणाला किती खोके पोहोचले यावरून आमदारांचा वाद सुरू असल्याचा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. तर आता या वादात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील उडी घेतली आहे. कुठंतरी पाणी मुरतंय त्यामुळेच रवी राणा यांनी आरोप केले आहेत. रवी राणा यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी दानवे यांनी केली आहे.