जिल्हा बँकेतील विजयानंतर राणे सिंधुदुर्गमध्ये दाखल, थोड्याच वेळात पत्रकार परिषद

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील भाजपच्या विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत, सिंधुदुर्गात सध्या भाजप कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष सुरू आहे, शिवसेना विरुद्ध राणे अशी प्रतीष्ठेची निवडणूक भाजपने जिंकल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांचे हौसले सध्या बुलंद आहेत.

जिल्हा बँकेतील विजयानंतर राणे सिंधुदुर्गमध्ये दाखल, थोड्याच वेळात पत्रकार परिषद
मंजिरी धर्माधिकारी | Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Dec 31, 2021 | 3:24 PM

सिंधुदुर्ग : जिल्हा बँकेतील भाजपच्या विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत, सिंधुदुर्गात सध्या भाजप कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष सुरू आहे, शिवसेना विरुद्ध राणे अशी प्रतीष्ठेची निवडणूक भाजपने जिंकल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांचे हौसले सध्या बुलंद आहेत. जिल्हा बँकेवर केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचं वर्चस्व निर्माण झालं आहे. या विजयानंतर राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केली आहे. आता कसं वाटतंय… गार गार वाटतंय… अशा घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी द्यायला सुरुवात केली आहे.

जिल्हा बँकेत कुणाला किती जागा

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या 19 पैकी 14 जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी 11 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर 5 जागा महाविकास आघाडीला जिंकता आल्या आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. तर भाजपचे विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. या ठिकाणी दोघांनाही समसमान मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठीद्वारे झालेल्या प्रक्रियेत त्याठिकाणी देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

राणे पत्रकार परिषदेत काय बोलणार?

थोड्याच वेळात नारायण राणे हे पत्रकार परिषद घेणार आहेत, निकालानंतर राणे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राणे विरुद्ध शिवसेना वाद टोकाला पोहोचला आहे, त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते, त्यामुळे ही निवडणूक जास्त प्रतिष्ठेची झाली होती.

BTS बँड नवीन वर्षाच्या निमित्तानं त्यांच्या चाहत्यांना देणार ‘हे’ खास सरप्राइझ…

Mumbai Corona: मुंबईतील पहिले पूर्णतः ऑक्सिजन सुसज्ज जंबो कोविड सेंटर लवकरच सेवेसाठी खुले होणार

Rabi Season : अवकाळीने नुकसान, अगोदर पूर्वसूचना मगच मिळणार भरपाई, अशी आहे प्रक्रिया

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us