नारायण राणेंना धक्का, कट्टर समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश

डोळस (Neelam Dolas) यांच्या शिवसेना प्रवेशामुळे नारायण राणेंना (Narayan Rane supporter) मोठा धक्का बसल्याचं मानलं जातंय. ईशान्य मुंबईचे प्रमुख कार्यकर्ते हरीश विचारे यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.

नारायण राणेंना धक्का, कट्टर समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश
| Edited By: | Updated on: Aug 31, 2019 | 6:17 PM

मुंबई : शिवसेनेतील इनकमिंग जोरात सुरु आहे. खासदार नारायण राणे यांच्या कट्टर समर्थक (Narayan Rane supporter) आणि चेंबूरच्या माजी नगरसेविका निलम डोळस (Neelam Dolas) यांनी शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रवेश केला. डोळस (Neelam Dolas) यांच्या शिवसेना प्रवेशामुळे नारायण राणेंना (Narayan Rane supporter) मोठा धक्का बसल्याचं मानलं जातंय. ईशान्य मुंबईचे प्रमुख कार्यकर्ते हरीश विचारे यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेत दररोज इनकमिंग होत आहे. यामुळे शिवसेनेची ताकद वाढत चालली आहे. निलम डोळस स्वगृही परत आल्या आहेत, त्यांचा अनुभव कामी येईल, असं मानखुर्दचे आमदार तुकाराम काते यांनी सांगितलं. शिवाय त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं.

ठाण्यात राष्ट्रवादीला पुन्हा धक्का

ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. मुरबाड तालुक्यातील माजी आमदार गोटीराम पवार यांचे सुपुत्र ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सु़भाष पवार यांनी जिल्हा परिषदेचे आठ सदस्य आणि सभापती बाजार समिती, सभापती कल्याण पंचायत समिती यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केला.

व्हिडीओ :