
चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी- नाशिक | 12 ऑक्टोबर 2023 : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांनी टीव्ही 9 मराठीली स्फोटक मुलाखत दिली. यात छगन भुजबळ यांनी शरद पवार, राष्ट्रवादी पक्षाबाबत मोठमोठे दावे केलेत. तसंच महाविकास आघाडीवरही त्यांनी भाष्य केलं. त्यांच्या या वक्तव्यांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. छगन भुजबळ खोटं बोलत आहेत. महविकास आघाडी ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षाच्या नेत्यांनी केलेली आघाडी आहे. महाविकास आघाडीची चर्चा सुरू असताना छगन भुजबळ नुकतेच तुरुंगातून सुटून बाहेर आले होते. भुजबळ आता काय म्हणत आहेत याला काहीही महत्व नाही. त्यांना मंत्रिपद हवं होतं. ईडीपासून संरक्षण हवं होतं. म्हणून ते भाजपसोबत गेले आहेत. मात्र फाईल कधीही बंद होत नाही, असं संजय राऊत म्हणालेत.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी होत आहे. विधानसभा अध्यक्षांच्या पुढे ही सुनावणी सुरु आहे. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनावणीबाबत अपेक्षा काय असणार आहेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेळ काढूपणा केलेला आहे. विधानसभा अध्यक्षांनी संविधान आणि कायदाचा मुडदा पाडलेला आहे. न्यायलयाने सांगून देखील निर्णय झालेला नाही, असं संजय राऊत म्हणालेत.
नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सापडलं. त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राची काळजी असेल तर नाशिकमधील ड्रग्स प्रकरणाची चौकशी करतील. ससूनमध्ये इतके दिवस तो व्यक्ती कसा राहिला. तो जेलमधून कसा बाहेर आला? त्याला कुठल्या भाजपच्या माणसाने मदत केली हे सगळ रेकॉर्डवर आलेलं आहे. सर्वात आधी दादा भुसे यांचा राजीनामा घेतला पाहिजे ते पुराव्यां संदर्भात छेडछाड करत आहेत, असं म्हणत दादा भुसे यांच्यावरही संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
भारत विरुद्ध गुजरात असा वाद निर्माण झाला आहे. गुजरात विरुद्ध मराठी नाहीतर गुजरात विरोध भारत असा वाद होईल. देशातील संपूर्ण छोटे छोटे उद्योग गुजराती व्यापाऱ्यांनी दिले जात आहेत, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.