त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त कृष्णकुंजवर, मंदिर उघडल्यानंतर झुंबड उडाली तर काय? राज ठाकरेंचा सवाल

| Updated on: Aug 17, 2020 | 4:33 PM

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट (Trimbakeshwar Temple trustee meet Raj Thackeray) घेतली.

त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त कृष्णकुंजवर, मंदिर उघडल्यानंतर झुंबड उडाली तर काय? राज ठाकरेंचा सवाल
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील मंदिर बंद ठेवण्यात आली आहेत. ही मंदिर पुन्हा खुली करण्यास सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी “मंदिर पुन्हा सुरु करावी, अशी विनंती सरकार दरबारी करा,” अशी मागणी त्यांनी राज ठाकरेंकडे केली. “मॉल उघडले तर मंदिर का नाहीत?” असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. (Trimbakeshwar Temple trustee meet Raj Thackeray)

याबाबतचा एक व्हिडीओ मनसेच्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यात राज ठाकरे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांशी चर्चा करताना दिसत आहे. यावेळी राज ठाकरेंनी “धार्मिक स्थळं उघडायला हवीत परंतु धार्मिक स्थळं उघडल्यानंतर झुंबड उडाली तर काय? असा प्रश्न विचारला. तसेच त्याची एक नियमावली ठरवावी लागेल, मी सरकारशी बोलतो. कारण मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत? असेही राज ठाकरेंनी सांगितले.

“हा एका मंदिराचा विषय नाही. सर्व मंदिरांचा आहे. मंदिर खुली झाली पाहिजे. पण त्याबाबत तुम्ही काय काळजी घेणार. मंदिर प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय उपाययोजना करणार हे सर्वात आधी ठरवलं पाहिजे. जर एकदम गर्दी झाली तर गोंधळ होईल, असे राज ठाकरे म्हणाले.

याबाबत त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त प्रशांत गायदने यांना विचारले असता ते म्हणाले, राज ठाकरेंशी त्र्यंबकेश्वरमध्ये होणारे धार्मिक विधी आणि त्र्यंबकेश्वरमधील ज्योतिलिंगाचे मंदिर हे उघडणे यावर विस्तृत चर्चा केली. यावर राज ठाकरेंनी यावर काही नियमावली काढता येईल का? जर मॉल्स महाराष्ट्रात उघडले तर मंदिर उघडली पाहिजेत या भूमिकेशी राज ठाकरे सहमत आहेत.

मात्र जर मोठ्या संख्येने भाविक आले तर आपण काय करणार त्याबाबतचे नियोजन काय, असे राज ठाकरेंनी विचारले. यासाठी शासनस्तरावर एखादी नियमावली जाहीर करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. (Trimbakeshwar Temple trustee meet Raj Thackeray)

संबंधित बातम्या :

कोरोनाच्या भीतीने गावकऱ्यांचा नकार, मुलांनी वडिलांचा मृतदेह सायकलवरुन स्मशानात नेला

हम बहुत छोटे लोग, हेलिकॉप्टरसे आते नही, 79 व्या वर्षी कोश्यारींनी पायीच शिवनेरी केला सर