आपण सगळे घाटी होतो, मुंबईतील फेरफटक्यादरम्यान शरद पवार-सुप्रिया सुळेंचा संवाद

| Updated on: May 07, 2021 | 7:35 PM

रुग्णालयातून घरी आल्यानंतर शरद पवारांना थोडं बरं वाटावं म्हणून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) त्यांना घेऊन घराबाहेर पडल्या. मुंबईत त्यांनी गाडीतून फेरफटका मारला. 

आपण सगळे घाटी होतो, मुंबईतील फेरफटक्यादरम्यान शरद पवार-सुप्रिया सुळेंचा संवाद
Sharad Pawar_Supriya Sule
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते आता सक्रिय झाल्याचं दिसतंय. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना (CM Uddhav Thackeray) पत्र लिहून, कोरोना काळात काही घटकांना मदत करण्याची मागणी केली आहे. रुग्णालयातून घरी आल्यानंतर शरद पवारांना थोडं बरं वाटावं म्हणून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) त्यांना घेऊन घराबाहेर पडल्या. मुंबईत त्यांनी गाडीतून फेरफटका मारला. (NCP chief Sharad Pawar and MP Supriya Sule car ride in Mumbai after surgery)

यावेळी सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह (Facebook Live) करुन शरद पवारांशी संवाद साधला. यादरम्यान दोघांनी सध्याची मुंबई आणि पूर्वीची मुंबई या विषयावर गप्पा मारल्या. शरद पवारांनी पूर्वीची अर्थात जुनी मुंबई कशी होती, काळानुसार काय काय बदलत गेलं, शरद पवार मुंबईत कधी आले, कुठे राहिले, हे सर्व त्यांनी या फेसबुक लाईव्ह दरम्यान सांगितलं.

सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यातील संवाद 

सुप्रिया सुळे : नमस्कार रितसर परवानगी घेऊन बाहेर पडलोय… लॉकडाऊन आहे याची जाणीव आहे, जबाबदारी आहे.. मी आणि बाबा चेंज म्हणून ड्राईव्हला आलोय, मुंबईमध्ये…

मुंबई किती बदलली, आपण आलो तेव्हाची आणि आताची मुंबई.. आपण 1971 मध्ये आलो ना… मी आणि आई ऑफिशिअली आलो…

शरद पवार: मी साधारणत: ६२-६३ मध्ये काँग्रेसचे युवक सेक्रेटरी म्हणून आलो.. त्यावेळी दादरला खेड गल्ली होती. तिथे सगळे मिल वर्कर होते. पुणे जिल्ह्यातील लोक जास्त होते. आता त्याचं नाव काकासाहेब गाडगीळ लेन असं आहे.. आता तिथे काँग्रेसचं टिळक भवन आहे. तिथे आम्ही राहायचो…. आम्ही तिथे ५ वर्ष टिळक भवनमध्ये राहिलो… मी काँग्रेस नेते असे बरेच होतो.. आता बदललंय सगळं.

त्यावेळी मुंबईत तो भाग जो आहे.. तो सामान्य लोकांचा होता… तिथे कोकणातील होते, घाटावरचे होते… कोकणी लोक मोठ्या संख्येने होते… सर्व कष्टकऱ्यांचा, कामगारांचा होता.. लालबाग, परळ वगैरे …

एकत्र येऊन सण साजरे करणे.. जसे कोकणात वेगवेगळे सण आहेत, ते साजरे करायचे… तेव्हा घाटावरचे लोक म्हणायचे… आपण सगळे घाटी होतो.. आपल्याला घाटी म्हणायचे..

आपल्याकडे काही लोक इकडे असायचे… मग गावाकडून कोणी कार्यकर्ता, पाहुणा आला की भागातील लोक सगळे जाऊन त्याला चांगलं जेवण वगैरे देणार, त्याला सिनेमा दाखवणार, तो माणूस गावाकडे जाऊन सांगायचा, काय माझी बडदास्त ठेवलेय, सिनेमा दाखवला, जेवण दिलं वगैरे .. ते लोक खुश होऊन जायचे.. गावाकडे सांगायचे आपले लोक कसे चांगले वागतात वगैरे

ती वेगळी मुंबई होती, आताची वेगळी आहे… ते कल्चर वेगळं होतं.. मुख्य म्हणजे इथला सामान्य माणूस गेला.. मराठी माणूस… आता बहुमजली इमारती आल्या.. समाजकारण बदललंय…

VIDEO : सुप्रिया सुळे यांचं फेसबुक लाईव्ह

 संबंधित बातम्या 

शरद पवार इज बॅक, कोरोना संकटात शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांना मदत देण्याचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सल्ला