भाषण सुरु असताना जिल्हाध्यक्ष मोबाईलमध्ये बिझी, अजित पवारांनी खडसावलं

| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

बारामती : कोल्हापूर येथील एका प्रदर्शनात एका रेड्याची किंमत ही 12 कोटी रुपये होती. याबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. याचवेळी त्यांनी मोबाईलचं वेड वाढल्यावरून कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. अजित पवार हे मोबाईलच्या विषयावर बोलत असतानाच जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे मोबाईलमध्ये गुंतल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे माझं भाषण सुरु असताना बघा आता […]

भाषण सुरु असताना जिल्हाध्यक्ष मोबाईलमध्ये बिझी, अजित पवारांनी खडसावलं
Follow us on

बारामती : कोल्हापूर येथील एका प्रदर्शनात एका रेड्याची किंमत ही 12 कोटी रुपये होती. याबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. याचवेळी त्यांनी मोबाईलचं वेड वाढल्यावरून कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. अजित पवार हे मोबाईलच्या विषयावर बोलत असतानाच जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे मोबाईलमध्ये गुंतल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे माझं भाषण सुरु असताना बघा आता माझा जिल्हाध्यक्ष मोबाईल बघण्यात दंग आहेत, हे मी कुणाला सांगू असा सवाल उपस्थित केला. त्यांच्यापेक्षा आपल्याला काम कमी आहे, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना कानपिचक्या दिल्या.

कोल्हापुरातला किस्सा आणि एकच हशा

अजित पवार इंदापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य शरद कृषी प्रदर्शाच्या उद्घाटनाला आले होते. त्यांनी यावेळी यांच्या खास शैलीत तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी कोल्हापूरमध्ये पाहिलेल्या 12 कोटी रुपये किंमतीच्या रेड्याचा किस्सा आपल्या खास शैलीत सांगत उपस्थितांमध्ये हशा पिकवला. बारा करोड रुपयांचा रेडा…. दिवसा ढवळ्या सांगतोय.. नाही तर म्हणचाल अजित काय आज टाकून आलाय का? असं म्हणत जसा घोडा देखना असू शकतो, गाई देखणी असू शकते, माणसही देखणी असतात… पण रेडाही देखना असू शकतो.. असं म्हणताच सभेत एकच हशा पिकला.

जिल्हाध्यक्ष मोबाईलवर गुंतले, अजित पवारांनी खडसावलं

सध्या नवी पिढी त्या मोबाईलमध्येच डोके घालून बसलेली असते. सतत बटणं दाबत बसलेले असतात, हे सर्व चुकीचं असून गरजेपुरताच मोबाईल वापरला पाहिजे. माझे भाषण सुरु असतानाच बघा आता माझा जिल्ह्याअध्यक्ष मोबाईल बघण्यात दंग आहे. हे मी कुणाला सांगू… हे चुकीचं आहे.. जिल्ह्याध्यक्षांएवढं काम मला नाही, पण त्यांच्यापेक्षा मला कमी काम आहे, असं म्हणत पुण्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना चिमटा काढला आणि ही विकृती असल्याचं त्यानी सांगितलं. आपण एखाद्याच्या घरी गेलो तर सगळे फोनमध्येच बसलेले असतात.. आलेल्या पाहुण्यांची विचारपुसही केली जात नाही. ही फार मोठी विकृती आहे, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

कार्यक्रम पत्रिकेवरुन कानपिचक्या

यावेळी अजित पवार यांनी बाजार समितीची कार्यक्रम पत्रिका उपस्थितांना हातात घेऊन दाखवली. मी महाराष्ट्रभर फिरत असतो पण असली पत्रिका मी दुनियेत पाहिली नाही, असं म्हणत, पत्रिकेत नाव टाकले जात नाही म्हणून नाराजी वाढते  एखाद्याचे नाव टाकले तर काय फरक पडतो, असंही ते म्हणाले. त्यांनी कार्यकर्त्यांना  मला का सारखं इंजेक्शन द्यायला लावता, आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून राष्ट्रवादी स्वाभिमानातून निर्माण झालेला पक्ष असल्याचं सांगत उपस्थित व्यासपीठावरील पक्षाच्या कार्यकर्त्यांना खडसावलं.

“घोडेबाजार इथेच मर्यादित ठेवा”

घोड्याला आपल्याकडे वैभव समजलं जातं. घोडे बाजारातील ज्ञान कौशल्य आणि अनुभव हे फक्त घोडेबाजारापुरतेच मर्यादित ठेवा. या अनुभवाचा उपयोग राजकीय घोडेबाजारात नसावा. एखाद्या घोड्याला जर पडेल त्या किमंतीला मिळाली नाही तर मोठं नुकसान होतं, असं सांगत त्यांनी कर्नाटक राज्यातील आमदारांना फोडायला सात कोटी आणि मुंबईत मनसेचे नगरसेवक फोडायला पाच कोटी देण्यात आल्याचं सांगत राजकीय घोडेबाजारावर घणाघाती टीका केली.