फडणवीस सरकारचा ‘हा’ निर्णय मागे घ्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

| Updated on: Dec 26, 2019 | 7:56 AM

मुंबई : पोलिस भरतीची लेखी परीक्षा ‘महापोर्टल’च्या माध्यमातून न होता, मैदानी चाचणीनंतर ऑफलाईन घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सुप्रिया सुळेंनी पत्र लिहून (Supriya Sule letter to CM) मुख्यमंत्र्यांना पोलिस भरती प्रक्रियेत सुधारणेची मागणी केली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यात पोलिसांचे मोठे योगदान असते. यासाठी ते […]

फडणवीस सरकारचा हा निर्णय मागे घ्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Follow us on

मुंबई : पोलिस भरतीची लेखी परीक्षा ‘महापोर्टल’च्या माध्यमातून न होता, मैदानी चाचणीनंतर ऑफलाईन घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सुप्रिया सुळेंनी पत्र लिहून (Supriya Sule letter to CM) मुख्यमंत्र्यांना पोलिस भरती प्रक्रियेत सुधारणेची मागणी केली.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यात पोलिसांचे मोठे योगदान असते. यासाठी ते शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे. मागील सरकारने मैदानी चाचणीपेक्षा लेखी परीक्षेचं महत्त्व वाढवून भरती प्रक्रियेत अन्यायकारक बदल केला. याचा सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील उमेदवारांवर प्रतिकूल परिणाम झाला, असा दावा सुप्रिया सुळेंनी पत्रात केला आहे.

ठाकरे सरकारने फडणवीस सरकारने काढलेला जीआर मागे घ्यावा. तसेच मैदानी चाचणीही लेखीप्रमाणे 100 गुणांची करावी. लेखी परीक्षा महापोर्टलच्या माध्यमातून न होता मैदानी चाचणीनंतर ऑफलाईन घ्यावी, अशी मागणीही सुळे यांनी केली आहे.

याशिवाय, पोलिस भरतीचं वेळापत्रक वर्षभर आधी जाहीर करावी, असंही सुप्रिया सुळे यांनी लिहिलं आहे. पोलिसातील पदांची संख्या वाढवून मेगाभरती करती, अशीही मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.

महापोर्टल रद्द करण्यासाठी सुप्रिया सुळे आक्रमक

सरकारी नोकर भरतीची प्रक्रिया करणाऱ्या महापरीक्षा पोर्टलवर मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून अनेक गंभीर आक्षेप घेतले जात आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांचा रोष लक्षात घेऊन राजकीय पक्षांनी देखील यात लक्ष घातल्याचं दिसत आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याची मागणी जोरदारपणे लावून धरली आहे.

शासकीय नोकर भरतीसाठी यापूर्वीच्या सरकारने सुरु केलेले महापोर्टल बंद करावे, अशी मागणी 1 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून सुप्रिया सुळे यांनी केली होती. ‘या सेवेत पारदर्शकता नाही अशी उमेदवारांची तक्रार असून पात्र उमेदवारांवरही अन्याय होत आहे. त्यामुळे हे पोर्टल बंद व्हावे ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं सुळेंनी सांगितलं होतं.

Supriya Sule letter to CM