अमरसिंह पंडितही बजरंग सोनवणेंच्या प्रचाराला, नाराजी मावळली

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे. बीड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडित यांच्या नावाची चर्चा होती. तशी त्यांची तयारीही जोरात सुरू झाली असतानाच बीडची उमेदवारी अचानक बजरंग सोनावणे यांना जाहीर झाल्याने अमरसिंह पंडित आणि त्यांचे समर्थक नाराज झाले. मात्र 12 तासातच नाराजी दूर सारून अमरसिंह पंडित यांनी बजरंग सोनावणे यांचा प्रचार सुरु […]

अमरसिंह पंडितही बजरंग सोनवणेंच्या प्रचाराला, नाराजी मावळली
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:16 PM

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे. बीड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडित यांच्या नावाची चर्चा होती. तशी त्यांची तयारीही जोरात सुरू झाली असतानाच बीडची उमेदवारी अचानक बजरंग सोनावणे यांना जाहीर झाल्याने अमरसिंह पंडित आणि त्यांचे समर्थक नाराज झाले. मात्र 12 तासातच नाराजी दूर सारून अमरसिंह पंडित यांनी बजरंग सोनावणे यांचा प्रचार सुरु केलाय. यामुळे अमरसिंह पंडित आणि समर्थकांची नाराजी आता मावळली असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ पाटोद्यातून फुटला.

महिनाभरापासून राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नसल्याची टीका भाजपकडून होत होती. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बीड लोकसभेसाठी मतदान होणार आहे. मात्र विद्यमान खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्याविरुद्ध तोडीस तोड उमेदवार राष्ट्रवादीकडे नाही, अशी टीका झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडित यांचे नाव समोर आले होते. तशी त्यांनी जोरदार तयारी देखील केली होती. मात्र अचानकपणे बजरंग सोनावणे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने अमरसिंह पंडित आणि त्यांचे समर्थक नाराज झाले. जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष तथा अमरसिंह पंडित यांचे बंधू विजयसिंह पंडित यांनी पक्षाविरुद्ध नाराजी दाखवत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती.

पाटोदा येथून प्रचाराची सुरुवात करताना राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित आणि प्रकाश सोळंके उपस्थित होते. तालुकानिहाय बैठका राष्ट्रवादीकडून सुरु करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीने ज्या बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिलीय, ते धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. त्यामुळेच धनंजय मुंडेंनी आता सोनवणेंच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे.

संबंधित बातम्या :

पंकजा मुंडेंसोबत काम करणार नाही : विनायक मेटे

बीडमध्ये राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा मुंडेंच्याच तालमीत तयार झालेला उमेदवार