AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांचा आणखी एक शिलेदार शिंदे यांच्या शिवसेनेत, काय मांडली भूमिका

uddhav thackeray eknath shinde : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे हे एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाल्या आहेत. विकासासाठी आपण जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांचा आणखी एक शिलेदार शिंदे यांच्या शिवसेनेत, काय मांडली भूमिका
neelam gorhe eknath shinde
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 07, 2023 | 2:36 PM
Share

मुंबई : राज्यातील राजकारणात वर्षभरापासून उद्धव ठाकरे यांना बसणारे धक्के काही कमी होत नाही. शिवसेनेतील एक एक नेते त्यांची साथ सोडून जात आहेत. वर्षभरापूर्वी उद्धव ठाकरे यांना सोडून ४० आमदार गेले. त्यानंतर गेल्या वर्षभरात राज्य अन् जिल्हापातळीवर अनेक नेते उद्धव ठाकरे यांना सोडून गेले. आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. शिवसेना ठाकरे गटातून त्या एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्या. मुंबईत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.

काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे

नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामांमुळे देशाचा विकास झाला आहे. मोदी यांनी राम मंदिराची उभारणी, कलम ३०७ कलम हे प्रश्न सोडवले. महिलांचा प्रश्न आणि देशाचा विकास हा मुख्य उद्देश ठेऊन मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुषमा अंधारे यांचे महत्व उद्धव ठाकरे यांच्या गटात वाढल्यामुळे आपण नाराज झाल्या का? या प्रश्नावर त्यांनी नकार दिला. माझी भूमिका विकासाची आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकास होत आहे. त्यामुळेच मी त्यांच्यसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे

शिवसेनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अनेक जण आपल्या पद्धतीने अर्थ लावत आहेत. त्यांना समाधान मानू द्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे जात आहे. त्यात राज्याचा वाटा असला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे मी आज नीलम गोऱ्हे यांचे पक्षात स्वागत करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आता आपणास महिलांसाठी मुक्तपणे काम करता येईल, असे त्यांनी नीलम गोऱ्हे यांना सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी आरोप करण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे. त्यांच्यावर ही वेळ का आली आहे? याचा विचार त्यांनी केला पाहिजे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

शिवसेना-भाजप विचाराने एक – फडणवीस

शिवसेना आणि भाजप विचाराने एक आहे. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यास मी उपस्थित राहिलो असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंकजा मुंडे दोन महिने सुटीवर जाणार आहे, त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, आम्ही त्यांच्याशी चर्चा करु. त्यांच्या भावना समजून घेऊ, असे फडणवीस यांनी सांगितले.

Follow Us
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..