केतकी चितळे महाराष्ट्रातील मिनी कंगना राणावत?; नीलम गोऱ्हे यांचा खोचक टोला काय?

| Updated on: Nov 14, 2022 | 5:22 PM

जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला हे दुर्देवी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावं. राजकारणात एकमेकांच्या विरोधात हिन पातळीवरचे वाभाडे काढणे सुरू आहे.

केतकी चितळे महाराष्ट्रातील मिनी कंगना राणावत?; नीलम गोऱ्हे यांचा खोचक टोला काय?
केतकी चितळे महाराष्ट्रातील मिनी कंगना राणावत?; नीलम गोऱ्हे यांचा खोचक टोला काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विवियाना मॉलप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर अभिनेत्री केतकी चितळे यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली होती. आव्हाडांवर विनयभंगाचं कलम दाखल करा, अशी मागणी केतकी चितळेने केली होती. केतकीच्या या विधानाचा ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी समाचार घेतला आहे. केतकी चितळेच्या रुपाने महाराष्ट्राला मिनी कंगना राणावत जन्माला येत आहे, अशा शब्दात नीलम गोऱ्हे यांनी टीका केली.

नीलम गोऱ्हे मीडियाशी संवाद साधत होत्या. जितेंद्र आव्हाड यांनी राजीनाम्याचा निर्णय घेऊ नये. नक्की विनयभंग झाला आहे का ते तपासाव लागेल, असं सांगतानाच केतकी चितळे यांना मी मदत केली होती. पण तिची काही विधाने पाहता केतकी चितळे हिच्या रूपाने महाराष्ट्रात मिनी कंगना राणावत जन्माला येत आहे, अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

विनयभंग झाला आहे का नाही याचा निर्णय कोर्ट देईल. मी तो व्हिडीओ पाहिला. त्यात जो समोर येईल त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड करताना दिसत आहे. वैर भावना राजकीय नेत्यांच्या मनात येऊ नये. त्यांनी संतापून किंवा दुःखी होऊन राजीनामा देऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला हे दुर्देवी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावं. राजकारणात एकमेकांच्या विरोधात हिन पातळीवरचे वाभाडे काढणे सुरू आहे. ते बरोबर नाही, असंही त्यांनी सांगितलं.

बाल दिनानिमित्त मुंबईत एका शाळेत कार्यक्रम ठरला होता. तिथे मुख्यमंत्री उशिरा पोहचले. मुख्यमंत्र्यांनी शाळेतील विद्यार्थी म्हणजे गुवाहाटीला नेलेले आमदार नाही हे लक्षात घ्यायला हवं, असा टोलाही त्यांनी लगावला.

50 खोक्यांवरुन बोलले तर एवढं का वाईट वाटतं? एका शिवसेना कार्यकर्त्याचा मला फोन आला होता. ते त्यांना रुमाल भेट देणार आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.