AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय दत्त याच्या दुसऱ्या पत्नीला प्रसिद्ध खेळाडूकडून मारहाण… लग्नाआधी झाली आई… चार भितींतील वाद कोर्टात पोहोचले आणि…

पहिल्या नवऱ्याला 10 वर्षात दिला घटस्फोट... संजय दत्तची केली फसवणूक... प्रसिद्ध खेळाडूसोबत राहिली लिव्हइनमध्ये... लग्नाआधी दिला मुलीला जन्म... त्याने केली मारहाण... चार भितींतील वाद कोर्टात पोहोचले आणि...

संजय दत्त याच्या दुसऱ्या पत्नीला प्रसिद्ध खेळाडूकडून मारहाण... लग्नाआधी झाली आई... चार भितींतील वाद कोर्टात पोहोचले आणि...
अभिनेता संजय दत्त
| Updated on: Dec 23, 2025 | 1:55 PM
Share

अभिनेता संजय दत्त याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आयुष्यात अनेक संकटांचा सामना केल्यानंतर संजय दत्त याने पुन्हा दमदार सुरुवात केली आहे. सध्या अभिनेता ‘धुरंधर’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या ‘धुरंधर’ सिनेमा फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील विक्रम रचत आहे. आता ‘धुरंधर’ सिनेमामुळे चर्चेत असणारा संजय एकेकाळी खासगी आयुष्यामुळे चर्चेत होता. संजूबाबाने तीन वेळा लग्न केलं. तिसऱ्या पत्नीसोबत आता अभिनेता आनंदी आयुष्य जगत आहे. तर, त्याच्या पहिल्या पत्नीचं कॅन्समुळे निधन झालं. पण अभिनेत्याच्या दुसऱ्या पत्नीबद्दल फार कोणाला माहिती नाही.

संजय दत्त यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव रिया पिल्लाई असं आहे. रिया हिचं देखील संजय याच्यासोबत दुसरं लग्न केलं. रिया हिने पहिलं लग्न मायकल वॉज याच्यासोबत केलं होतं. रिया आणि मायकल यांचं लग्न फक्त 10 वर्ष टिकलं. त्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 1994 मध्ये रिया आणि मायकल यांचा घटस्फोट झाला.

पहिल्या घटस्फोटानंतर रिया हिने संजूबाबा याच्यासोबत दुसरं लग्न केलं. पण विवाहित असताना, रिया हिचं टेनिस खेळाडू लिएंडर पेस याच्यासोबत प्रेमसंबंध सुरु होते. विवाहबाह्यसंबंध असल्यामुळे रिया आणि सजंय यांचा घटस्फोट झाला. पण लिएंडर याने कधीच  रिया हिच्यासोबत लग्न केलं नाही. दोघे तब्बल 10 वर्ष लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होते… लिएंडर आणि रिया यांना एक मुलगी देखील आहे.

पण लिएंडर आणि रिया यांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही… दोघांमध्ये अनेक वाद सुरु झाले. अशात रिया हिने लिएंडर याच्यावर अनेक गंभीर आरोप देखील केले. रिया पिल्लईने 2014 मध्ये लिएंडर पेसविरुद्ध खटला दाखल केला होता. तिने पेस आणि त्याच्या वडिलांवर घरगुती हिंसाचार, भावनिक आणि आर्थिक छळाचे आरोप केले होते.

आठ वर्षांनंतर, न्यायालयाने त्यांचं नातं विवाहाच्या स्वरूपाचं असल्याचा निकाल दिला.न्यायालयाने टेनिस खेळाडूला रियाला दरमहा 50 हजार रुपये भाडे आणि 1 लाख रुपये देखभालीसाठी देण्याचे आदेश दिले. याशिवाय, ही देखभाल दरवर्षी 5 टक्के दराने वाढेल..असा निर्णय कोर्टाने सुनावला… 

आता रिया मुलीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर देखील रिया सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप.