Sanjay Raut | हिंदुत्ववादी आहात ना.. आधी चीनकडून कैलास मानससरोवर मिळवा, संजय राऊतांचा भाजपला सल्ला!

बेरोजगारी, आर्थिक दुरवस्थेवर कुणी बोलत नाही. मशीद-मंदिर, नावं बदलणं यावरच निवडणुका लढवल्या जात आहेत. कैलास मानससरोवरावर शंकराचं स्थान आहे. ते चीनच्या ताब्यात आहे. ते मिळावा ना आधी..असा सल्ला राऊतांनी दिला.

Sanjay Raut | हिंदुत्ववादी आहात ना.. आधी चीनकडून कैलास मानससरोवर मिळवा, संजय राऊतांचा भाजपला सल्ला!
| Edited By: | Updated on: May 19, 2022 | 1:45 PM

नवी दिल्लीः तुम्ही हिंदुत्ववादी आहात तर मग आधी चीनच्या ताब्यात असलेलं कैलास मानस सरोवर मिळवून दाखवा. तिथं शंकराचं स्थान आहे. आपल्याच देशात मंदिर-मशिदीचा मुद्दा का उचलून धरतायत, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला दिला आहे. वाराणसी येथील ज्ञानवापी मशीदीसारख्या प्रत्येक धार्मिक आणि ऐतिहासिक जागांचं उत्खनन करुन तणाव वाढवायचा, दंगांची स्थिती निर्माण करून निवडणूक (Elections) जिंकायच्या, हाच भाजपच्या सध्याच्या कारवायांमागे हेतू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. संजय राऊत यांनी नुकताच लडाख (Ladakh) येथे दौरा केला. लडाखमधील सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारने 40 खासदारांची एक समिती नेमली असून यातील सदस्यांमध्ये संजय राऊत यांचा समावेश आहे. नुकताच लडाख दौरा करून नवी दिल्लीत परतलेल्या संजय राऊत यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे या समितीत खासदार नवनीत राणा यांचाही समावेश आहे. मात्र त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया देण्यात संजय राऊत यांनी टाळलं..

राऊतांचा भाजपाला काय सल्ला?

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीमध्ये सुरु असलेल्या सर्वेक्षणाबाबत संजय राऊत यांनी भाजपवर तीव्र नाराजी दर्शवली. 2024 च्या निवडणुकांसाठी भाजपने रचलेला हा डाव असल्याचं त्यांनी म्हटलं. राऊत म्हणाले, ‘ 2024 ची तयारी सुरु आहे. असा पद्धतीनं चालू आहे की, प्रत्येक धार्मिक , ऐतिहासिक जागांचं उत्खनन करून तणाव वाढायचा. काशी-मथुरा म्हणून आम्हाला त्याचा अभिमानही आहे. पण देशात त्या माध्यमातून दंगली पेटवायच्या आणि निवडणूका लढवायच्या. हे दोन्ही बाजूंनी टाळावं लागेल. भाजप असो वा इतर लोकं असतील. आम्हीसुद्धा त्यात आहोत. प्रत्येक पाऊल संयमानं आणि काळजीपूर्वक टाकावं लागेल. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढायला हवी. राम मंदिर उभारल्यानंतर अशा प्रकारचे प्रश्न संपवायला हवेत. महागाईवरती कुणी बोलत नाही. बेरोजगारी, आर्थिक दुरवस्थेवर कुणी बोलत नाही. मशीद-मंदिर, नावं बदलणं यावरच निवडणुका लढवल्या जात आहेत. कैलास मानससरोवरावर शंकराचं स्थान आहे. ते चीनच्या ताब्यात आहे. ते मिळावा ना आधी..असा सल्ला राऊतांनी दिला.

‘बृजभूषण लढवैय्ये’

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला तेथील खासदार बृजभूषण यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता, संजय राऊतांनी यामागील कारण सांगायचं टाळलं. ते म्हणाले, ‘ राज ठाकरेंबद्दलच्या उत्तर प्रदेशाच्या जनतेच्या भावना असतील. त्या भावनांचा उद्रेक नेत्याद्वारे होत असेल तर संवाद साधावा लागेल… उत्तर प्रदेशातील नागरिकांविरोधात राज ठाकरेंची भूमिका होती. एका रात्रीतून त्यांनी ती बदलली. हिंदुत्ववादी झाले. अयोध्येला निघाले. राज ठाकरे तिथे कितीही वेळा जाऊन येवो, आम्हाला फरक पडणार नाही. त्यांनी तेथे राहो.. मठ, आश्रम बांधो.. काहीही करोत. आमचा अयोध्येशी आधीपासून संबंध आहे. बृजभूषण लढवय्या आहेत. महाराष्ट्राशी संबंध फार जुने आहेत. आम्ही त्यांना प्रेमानं नेताजी म्हणतो. लोकांमध्ये काम करणारा माणूस आहे. पैलवान आहे. कुस्तीगर निर्माण केले आहेत. तरुणांना व्यासपीठ मिळावं म्हणून काम केलंय. मागे हटणारा नाही.. त्यामुळे ते त्यांची भूमिका ठामपणे मांडतील.

‘संभाजीराजेंच्या प्रत्येक भूमिकेला पाठिंबा होता’

छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘ राजा असो की प्रजा.. निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. छत्रपती संभाजी राजे यांच्यावर आमचं सगळ्यांचंच प्रेम आहे. पण ही निवडणूक आहे. आपण कोणत्या भूमिका घेऊन उभे राहतोय, त्यावर सगळं अवलंबून असतं. . शिवसेनेच्या वाट्याला दोन जागा आहेत. आम्ही लढू. आता त्यांनी ठरवावं शिवसेनेचा म्हणून निवडून यायचं आहे की काय… भाजपच्या सहकार्यानं त्यांनी आधीचं पद स्वीकारलं होतं. त्यांच्या भूमिकांना आम्ही पाठिंबा दिला आहे. मराठा आंदोलनापासून.. आरक्षणापर्यंत… मी स्वतः सभागृहात त्यांना पाठींबा दिला होता. आता ते काय भूमिका घेतील, तो सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.