कोकणात मोठे उलटफेर, आता नारायण राणेंची जागा निलेश राणे लढवणार?

निलेश राणे हे भरघोस मतांनी निवडून येऊन कुडाळ मालवणचे आमदार होऊदे असं साकडं सिंधुदुर्ग राजाला घालण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे यावेळी निलेश राणे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच हे साकडे घालण्यात आल्याने, आता निलेश राणे आगामी लोकसभेऐवजी, विधानसभेचीच निवडणूक लढवण्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

कोकणात मोठे उलटफेर, आता नारायण राणेंची जागा निलेश राणे लढवणार?
Nilesh Rane_Narayan Rane
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 12:15 PM

सिंधुदुर्ग : नारायण राणे (Narayan Rane) यांना भाजपने (BJP) केंद्रीय मंत्रिपद दिल्यानंतर आता कोकणातील राजकारणात (Konkan Politics) वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. कारण नारायण राणे यांनी विधानसभेत (Vidhan Sabha Election) ज्या मतदारसंघाचं नेतृत्त्व केलं, त्याच कुडाळ मालवण मतदारसंघात (Kudal Malvan) पुन्हा रंगत येण्याची चिन्हं आहेत. कारण आता या मतदारसंघासाठी माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

निलेश राणे हे भरघोस मतांनी निवडून येऊन कुडाळ मालवणचे आमदार होऊदे असं साकडं सिंधुदुर्ग राजाला घालण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे यावेळी निलेश राणे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच हे साकडे घालण्यात आल्याने, आता निलेश राणे आगामी लोकसभेऐवजी, विधानसभेचीच निवडणूक लढवण्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदारसंघातून निलेश राणे हे निवडणूक लढवतील हे या निमित्ताने बोललं जात आहे. यावेळी निलेश राणे यांनी चिपी विमानतळावरून पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे केंद्रामध्ये वजन आहे. त्यामुळेच आता चिपी विमानतळ मार्गी लागतोय. कोण हौसे, गवसे, नवसे खासदार झालेत म्हणून विमानतळ होत नाही, असं निलेश राणे म्हणाले.

कुडाळ मालवण विधानसभा

कुडाळ मालवण विधासभेत सध्या शिवसेनेचे वैभव नाईक हे नेतृत्त्व करतात. वैभव नाईक यांनी 2014 मध्ये दिग्गज नेते नारायण राणे यांचा पराभव केला होता. तेव्हापासून या मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व आहे.

कोकणातल्याच नव्हे तर राज्याच्या राजकीय पटलावर सिंधुदुर्गचं एक वेगळ स्थान राहीलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदासंघ आहेत. यामध्ये कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या मतदारसंघांचा समावेश आहे. 2014 मध्ये यापैकी 2 जागा शिवसेनेकडे तर एक काँग्रेसने जिंकली होती. तर 2019 मध्ये भाजपच्या नितेश राणेंनी एक आणि शिवसेनेने दोन जागी विजय कायम राखला.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं?

2014 ला कुडाळ-मालवण मतदारसंघातून शिवसेनेचे वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) नारायण राणेंचा पराभव करत 10,500 मतांनी विजयी झाले. या मतदारसंघात चौरंगी लढत झाली होती. शिवसेनेच्या वैभव नाईक यांना 71 हजार, काँग्रेसच्या नारायण राणे यांना 60,500, तर भाजपच्या बाब मोंडकर यांना 4500 आणि राष्ट्रवादीच्या पुष्पसेन सावंत यांना 2500 मते पडली होती. नारायण राणेंचा अनपेक्षित पराभव करून वैभव नाईक हे राज्यात जाएन्ट किलर म्हणून गणले जाऊ लागले.

नितेश राणे यांचा विजय

तिकडे सिंधुदुर्गातील कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला. त्यांनी 2014 मध्येही विजय मिळवला होता तर शिवसेनेच्या सतीश सावंत यांचा पराभव करुन, नितेश राणे 2019 मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाले.

लोकसभा निवडणुकीत निलेश राणेंचा पराभव

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निलेश राणे यांना 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये पराभव झाला होता. दोन्ही वेळी शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी त्यांचा पराभव केला. आता निलेश राणे हे एकेकाळी नारायण राणे प्रतिनिधीत्व करत असलेल्या कुडाळ मालवण मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.  

2014 च्या लोकसभेला मिळालेली विधानसभा निहाय मते

मतदारसंघ                   निलेश राणे         विनायक राऊत     मताधिक्य

चिपळूण                       53 952               85132                31140

रत्नागिरी                      62569                94134                31565

राजापूर                       55569                77814                22245

कणकवली                    71264                72641                1607

कुडाळ                          52240                74129                 21835

सावंतवाडी                   47365                89986                41630

एकूण                    343037           493088              1,0 50 051

संबंधित बातम्या   

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Results : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निकाल 2019

Sindhudurg district Assembly results | सिंधुदुर्ग जिल्हा विधानसभा निकाल

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.