AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जे जे बाळासाहेबांचे, ते ते शिंदेंचे… वाटीभर पक्षाने आता हट्ट सोडावा, उद्धव ठाकरेंना कुणी डिवचलं?

मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न शिंदे समर्थकांनी केला. यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

जे जे बाळासाहेबांचे, ते ते शिंदेंचे... वाटीभर पक्षाने आता हट्ट सोडावा, उद्धव ठाकरेंना कुणी डिवचलं?
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 29, 2022 | 10:51 AM
Share

गजानन उमाटे, नागपूरः एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबरोबर बहुतांश शिवसैनिक असल्याने जे जे बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) आहे, ते ते एकनाथ शिंदेंचे आहे, असं वक्तव्य भाजप नेता नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलंय. तर उद्धव ठाकरे यांचा गट आता वाटीभरच शिल्लक राहिलाय. त्यामुळे त्यांनी हट्ट सोडावा, अशा शब्दात त्यांना सुनावलं.

मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालयावर दावा ठोकण्यासाठी काल एकनाथ शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये तुफ्फान हाणामारी झाली. शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न शिंदे समर्थकांनी केला. यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, ‘ ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यालय आहे. त्यांचा अधिकार ते घेणार. जे बाळासाहेबाचे आहे ते सर्व शिंदेचे आहे. उद्धव ठाकरे यांचा वाटी एवढा ग्रुप राहिला त्यांनी हट्ट सोडला पाहिजे. जिथे जिथे बाळासाहेब बसायचे तिथे शिंदेचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत उरलेले जे कार्यालयात गेले त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं. कालची घटना हा दादागिरीचा प्रकार आहे. ही मस्ती सत्तेच्या जोरावर सुरू आहे, जनतेनेच ती उतरवली पाहिजे… शिंदे गटाला कार्यालय असणे वावगे नाही… त्यामुळे त्यांना हवे होते तर दुसरे कार्यालय बघायचे होते…

नितेश राणेंच्या वक्तव्याला उत्तर देताना दानवे म्हणाले, ‘ हे वाटीभर असलेले शिवसैनिकच नाकात पाणी आणतील….

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही कालच्या घटनेवरून शिंदे गटावर टीका केली. ते म्हणाले, ‘ भाजपासारखा अहंकार शिंदे गटाला चढला आहे. दुसऱ्याच्या घरात जाऊन सामान बाहेर फेकलं तर कसं वाटेल तसंच आता ठाकरे गटालाही वाटत आहे. मात्र सध्या शिंदे गटाकडून अतिक्रमण केलं जातंय.

Follow Us
शिल्पा गवारे यांच्या शोकसभेत उपमहापौर हसल्या; VIDEO होतोय व्हायरल
एका बाजूला शिल्पा गवारे यांना श्रद्धांजली, दुसरीकडे उपमहापौर हसताना दिसल्या; VIDEO होतोय व्हायरल
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस! शिष्टमंडळाची आज पुन्हा भेट
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस! सरकारच्या शिष्टमंडळाची आज पुन्हा भेट, चर्चेकडे महाराष्ट्राचं लक्ष
मसाज सेंटरच्या नावाखाली काय सुरू होतं?; पोलिसांनी टाकला छापा
Nanded | मसाज सेंटरच्या नावाखाली काय सुरू होतं?; डमी ग्राहक पाठवून पोलिसांनी टाकला छापा, 7 महिलांची सुटका
माझा भाऊ गेला, आता सत्ता हे लोक उपभोगत आहेत! सुप्रिया सुळे संतापल्या
Supriya Sule on Ajit Pawar Accident | माझा भाऊ गेला, आता सत्ता हे लोक उपभोगत आहेत! सुप्रिया सुळे संतापल्या; अजित पवारांच्या अपघातावरून घणाघात
जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा एल्गार! परळी बंद
Maratha Reservation | जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा एल्गार! परळी बंद, हिंगोली-नांदेडमध्ये रास्ता रोको
मुंबईत RSS-BJPची मोठी समन्वय बैठक! फडणवीसांसह मंत्री उपस्थित
Mumbai RSS BJP | मुंबईत RSS-BJPची मोठी समन्वय बैठक! फडणवीसांसह मंत्री उपस्थित; राजकीय-सामाजिक मुद्द्यांवर मंथन
धनगर समाजाचा 7 सप्टेंबरला राज्यव्यापी एल्गार! ST आरक्षणाच्या मागणीसाठी
Gopichand Padalkar | धनगर समाजाचा 7 सप्टेंबरला राज्यव्यापी एल्गार! ST आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर आंदोलनाची हाक
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!