शिर्डीतल्या सभेत गडकरींना भोवळ, सध्या प्रकृती स्थिर

| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

शिर्डी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पुन्हा एकदा भोवळ आल्याचा प्रकार घडलाय. शिर्डी लोकसभेसाठी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी गडकरी शिर्डीला गेले होते. पण सभेला पोहोचल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि भोवळ आली. यानंतर गडकरी तातडीने शिर्डीहून पुढे रवाना झाले. यापूर्वीही गडकरींना चालू कार्यक्रमात भोवळ आली होती. राहुरी विद्यापीठाच्या कार्यक्रमात त्यांना 7 डिसेंबर […]

शिर्डीतल्या सभेत गडकरींना भोवळ, सध्या प्रकृती स्थिर
Follow us on

शिर्डी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पुन्हा एकदा भोवळ आल्याचा प्रकार घडलाय. शिर्डी लोकसभेसाठी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी गडकरी शिर्डीला गेले होते. पण सभेला पोहोचल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि भोवळ आली. यानंतर गडकरी तातडीने शिर्डीहून पुढे रवाना झाले.

यापूर्वीही गडकरींना चालू कार्यक्रमात भोवळ आली होती. राहुरी विद्यापीठाच्या कार्यक्रमात त्यांना 7 डिसेंबर 2018 रोजी भोवळ आली. यानंतर ते तातडीने नागपूरला रवाना झाले होते. गडकरींना ब्लड शुगरचा त्रास असल्याचं बोललं जातं. वाढलेलं तापमान आणि उकाड्यामुळे शिर्डीतील सभेत त्यांना अस्वस्थ वाटल्याचं बोललं जातंय. पण सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

शिर्डीतल्या सभेत गडकरी भाषणासाठी उभे होते. या भाषणात त्यांनी सरकारच्या विविध कामांबद्दल माहिती दिली आणि भाषण आटोपतं घेतलं. भाषण संपताच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. बाजूलाच उपस्थित असलेल्या नेत्यांना त्यांना हात दिला आणि खुर्चीवर बसवलं. यानंतर गडकरी पुढे रवाना झाले. गडकरींनी शिर्डीत साई बाबांचं दर्शन घेतलं आणि विजयासाठी साकडं घातलं. राहुरीत भोवळ आल्यानंतरही गडकरी साई चरणी लीन झाले होते.

पाहा व्हिडीओ :