NMC Election 2022 : नागपूर महानगर पालिका प्रभाग क्रमांक 1ची रचना बदलली! राजकीय गणितही बदलणार?

NMC Election 2022 ward No. 01: चला जाणून घेऊयात नागपूर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक एक बद्दल

NMC Election 2022 : नागपूर महानगर पालिका प्रभाग क्रमांक 1ची रचना बदलली! राजकीय गणितही बदलणार?
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 20, 2022 | 6:00 AM

नागपूर : महाराष्ट्रातील पालिका निवडणुकांचे (Maharashtra Election 2022) वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातील पालिकेवर यंदाच्या निवडणुकीत कुणाचा झेंडा फडकतो, याकडे संपूर्ण राज्याची नजर असणार, हे नक्की. त्यामुळे नागपूर पालिका निवडणुकीला (NMC Election 2022) विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. याच पार्श्वभूमीवर पालिका निवडणुकीची रचना, आरक्षण या सगळ्यावरुनही पालिका निवडणुकीचं राजकारण तापण्याची चिन्हा आहे. नागपूर पालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये 2022 च्या रचनेप्रमाणे एकूण तीन वॉर्ड येतात. याआधी प्रभाग क्रमांक मध्ये चार वॉर्ड होते. आता नव्या रचनेप्रमाणेत या प्रभागामधील कोणता वॉर्ड आरक्षित झाला आहे? कुणासाठी आरक्षित झाला आहे? प्रभाग क्रमांक एकमध्ये नेमका कोणकोणता भाग मोडतो, यासोबत या प्रभागातील एकूण लोकसंख्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत किती होती? कोणत्या प्रभागातून 2017 साली झालेल्या निवडणुकीत कोण निवडणून आलेलं होतं? या सगळ्याचा सविस्तर आढावा घेणार आहोत.

2017 साली नागपूर महानगर पालिकेमध्ये भाजपने निर्विवाद आपलं वर्चस्व राखलं होतं. नागपुरात भाजप हा सर्वात मोठा पक्ष पालिका निवडणुकीत ठरला होता. तर त्यानंतर काँग्रेस, मग बीएसपी आणि सगळ्यात शेवटी शिवसेनेचा नंबर लागला होता.

नागपूर महानगर पालिका : प्रभाग क्रमांक 1

  • प्रभाग क्रमांक 1 मध्ये नेमके किती वॉर्ड? : 3

प्रभाग क्रमांक एकमधील आरक्षण पुढीलप्रमाणे :

  • प्रभाग क्रमांक 1 अ : अनुसूचित जाती महिला
  • प्रभाग क्रमांक 1 ब : सर्वसाधारण महिला
  • प्रभाग क्रमांक 1 क : सर्वसाधारण

2017 साली कोण जिंकलं होतं?

प्रभाग क्रमांक 1 मध्ये 2017 साली एकूण चार वॉर्ड होते. त्यात बदल होऊन आता फक्त तीनच वॉर्ड करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रस्थापितांना धक्का बसला आहे. शिवाय आरक्षणामुळेही नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरण काय राहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, 2017 साली प्रभाग क्रमांक एकमध्ये भाजपचा निर्विवाद वर्चस्व राहिलं होतं. चारही वॉर्डात भाजपचा उमेदवार निवडून आलेला होता.

2017 साली निवडून आलेल्या विजयी उमेदवारांची नावे

  • प्रभाग क्रमांक 1 अ : महेंद्रप्रसाद रमेश धनविजय, भाजप, मतं 11366
  • प्रभाग क्रमांक 1 ब : सुषमा संजय चौधरी, भाजप, मतं 12021
  • प्रभाग क्रमांक 1 क : प्रमिला प्रितम माथरानी, भाजप, मतं 10326
  • प्रभाग क्रमांक 1 ड : विरेंद्र घनश्यामदास कुकरेजा, भाजप, मतं 10715

नागपूर महानगर पालिका 2022 प्रभाग क्रमांक 1 अ

 उमेदवारविजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
मनसे
इतर

नागपूर महानगर पालिका 2022 प्रभाग क्रमांक 1 ब

 उमेदवारविजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
मनसे
इतर

नागपूर महानगर पालिका 2022 प्रभाग क्रमांक 1 क

 उमेदवारविजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
मनसे
इतर

प्रभाग क्रमांक 1 : लोकसंख्या

  • एकूण लोकसंख्या 48040
  • अनुसूचित जाती 15622
  • अनुसूचित जमाती 1290

नव्या रचनेप्रमाणे नागपुरात एकूण 156 वॉर्डमध्ये प्रत्येकी तीन प्रभाग आहेत. त्यातील 31 प्रभाग अनुसूचित जाती, 12 वॉर्ड अनुसूचित जमाती तर 113 वॉर्ड हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. अनुसूचित जातीच्या 31 पैकी 16 प्रभागात महिलांना, अनुसूचित जमातीच्या 12 पैकी 6 प्रभागांत महिलांना तर सर्वसाधारण प्रवर्गातील 113 पैकी 56 प्रभागात महिलांना आरक्षण देण्यात आलं आहे. 156 पैकी एकूण 78 प्रभाग हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

2017सालचा नागपूर महानगर पालिकेचा निकाल

  • एकूण जागा 151
  • भाजप 108
  • काँग्रेस 29
  • बीएसपी 10
  • शिवसेना 2
  • राष्ट्रवादी काँग्रेस 1
  • अपक्ष 1

नागपूर प्रभाग क्रमांक एकची सीमा

नागपूर प्रभाग क्रमांक एक मध्ये आर्यनगर, शंभूनगर, नारा, अशोकानगर, न्यू नागपूर सोसायटी, ओमनगर, कुकरेजानगर, आहुजानगर, अंगुलमाल नगर, संतलालजीनगर, धमगाळेनगर, हुडको कॉलनी, भक्तीसागर नगर, जयविजय लेआऊट, पाटील लेआऊट, बंब्लेश्वरीनगर, बोंद्रे लेआऊट, एस.जे. कॉलनी, मलका कॉलनी, तारकेश्वर नगर आदी प्रभाग मोडतो.