कुत्रा…हलकट…मी त्यांच्या…वायझेड, डुक्करतोंड्यानंतर आता लक्ष्मण हाकेंच्या पत्नीची ऑडिओ क्लिप व्हायरल!

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या पत्नी विजया हाके यांची एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये त्या शिवराळ भाषेचा वापर करताना दिसतायत.

कुत्रा...हलकट...मी त्यांच्या...वायझेड, डुक्करतोंड्यानंतर आता लक्ष्मण हाकेंच्या पत्नीची ऑडिओ क्लिप व्हायरल!
laxman hake and vijaya hake
| Updated on: Jun 07, 2025 | 7:38 PM

Laxman Hake Wife Viral Audio Clip : ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके हे गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका करत आहेत. ओबीसी समाजासाठी करण्यात आलेल्या तरतुदींनुसार निधी मिळत नाही, अशी त्यांची तक्रार आहे. या आरोपांनंतर लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी एकमेकांचा अभ्रद्र भाषेचा उल्लेख करून चांगलाच उद्धार केला. या सर्व कारणांमुळे लक्ष्मण हाके चर्चेत असतानाच आता त्यांच्या पत्नीची (विजया हाके) एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये त्या एका महिलेशी बोलताना शिवराळ भाषेचा वापर करताना दिसत आहेत.

लक्ष्मण हाके यांच्या पत्नीची ऑडिओ क्लिप व्हायरल?

सध्या लक्ष्मण हाके यांच्या पत्नीची एक शिविगाळ करतानाची एक कथित ऑडिकओ क्लिप समोर आली आहे. लक्ष्मण हाके यांच्याविरोधात पोस्ट करणाऱ्या धायगुडे यांच्या पत्नीशी त्या बोलत असल्याचा दावा करण्यात येतोय. लक्ष्मण हाके हे राखी सावंत आहे. पैसे आणि टीआरपीसाठी काहीही करायला तयार असतात, अशी पोस्ट हनुमंत धायगुडे यांनी केली होती. त्यानंतर आता ही कथित ऑडिओ क्लिप समोर आल आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे?

या कथित ऑडिओ क्लिपमध्ये लक्ष्मण हाके यांच्या पत्नी विजया हाके या हनुमंत धायगुडे यांच्या पत्नी दिव्या धायगुडे यांच्याशी बोलत असल्याचा दावा केला जातोय. “तुमच्या मिस्टरांचं काय चाललंय. तुमचे मिस्टर काहीतरी पोस्ट करत आहेत. हालकट मेला. त्यांना काय कमी पडलं होतं. मी त्यांच्या आलेल्या प्रत्येक नातेवाईकाला साडी घेतलेली आहे. प्रत्येक नातेवाईकाची उठाठेव केली आहे. माझं काय चुकलं गं. कुत्रा मेला. असाच तडफडून मरेल ना. माझं काय चुकलं हे सांग. तो असं का करतोय. माझ्या घरात रोज येऊन जेवत होता,” असं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

माझी जीभ काळी…

तसेच, मी जॉबला जाते. मला वेळ नसते. मी माझ्या स्वत:च्या कष्टाने काही घेत असेल तर त्या कुत्र्याला काय अडचण आहे. तो कुत्राच आहे. मी त्याला कुत्राच बोलणार. मी त्याला का नीट बोलू. मी त्याला चहा दिला, जेवण दिलं. माझी जीभ काळी आहे. तो असाच मरेल, असे शिव्याशाप देताना या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

(टीप- टीव्ही 9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही)