पंकजा मुंडेंविरोधात आक्षेपार्ह विधानाचा आरोप, धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल

| Updated on: Oct 20, 2019 | 12:14 AM

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला (FIR register on Dhananjay munde) आहे.

पंकजा मुंडेंविरोधात आक्षेपार्ह विधानाचा आरोप, धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल
Follow us on

बीड (परळी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे धनंजय मुंडेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात (FIR register on Dhananjay munde)  आहे.

धनंजय मुंडे यांनी केज मतदारसंघातील प्रचारसभेदरम्यान पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. ही सभा दोन दिवसांपूर्वी पार पडली होती. या सभेनंतर याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यामुळे परळीतील वातावरण चांगलेच तापले होते.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आज पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच आज शेकडो कार्यकर्ते परळी पोलिस ठाण्याकडे रवाना झाले. यावेळी धनंजय मुंडेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात (FIR register on Dhananjay munde)  आली. नुकतंच परळी शहर पोलीस ठाण्यात कलम 500, 509, 294 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनंजय मुंडे यांचे स्पष्टीकरण 

यानंतर अवघ्या काही सेकंदात धनंजय मुंडे यांनी खुलासा करणारी एक पोस्ट फेसबुकवर पोस्ट केली. “सोशल मीडियावरील व्हायरल होणारी ती क्लीप एडिट केलेली आणि माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी”, अशी मागणी स्वतः धनंजय मुंडे यांनी केली आहे.

“अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा , आपली निवडणूक विकास कार्यावर आहे, ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नका ही कळकळीची विनंती” त्यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील लक्षवेधी लढत ही बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात होत आहे. बीड जिल्ह्यात मुंडे बहीण-भावात नेहमीच संघर्ष असतो. रक्ताचं नात असलं तरीही अत्यंत टोकाला पोहोचल्यामुळे दोन्ही बहीण-भावात साधा संवादही होत नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये विजय कोणाचा होणार यावर या भाऊ आणि बहिणीचे राजकीय अस्तित्व ठरणार आहे.

परळी विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा पंकजा मुंडे या विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात आहेत, तर त्यांचे भाऊ धनंजय मुंडे हे दुसऱ्यांदा आपल्या बहिणीचा सामना करण्यासाठी समोरासमोर निवडणुकीत उभे आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडे यांनी 25 हजार मतांनी पराभव केला होता.

गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली मृत्यूनंतर अवघ्या सहा महिन्यांमध्ये ही विधानसभेची निवडणूक झाली होती. त्यामुळे स्वाभाविकपणे गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली मृत्यूनंतर तयार झालेल्या सहानुभूतीचा फायदा पंकजा मुंडे यांना झाला, असा आरोप धनंजय मुंडे मागच्या पाच वर्षापासून वारंवार करत आहेत. मात्र मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर सुद्धा पुन्हा धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधातील आपली राजकीय कुरघोडी कायम चालू ठेवली. म्हणूनच मागच्या पाच वर्षांमध्ये धनंजय मुंडे यांनी परळी नगरपालिका परळी मार्केट कमिटी जिल्हापरिषद आणि पंचायत समितीमध्ये पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव केला.

2014 नंतर 2019 च्या या विधानसभा निवडणुकीपर्यंत धनंजय मुंडे यांच्या मागचा जनाधार मोठा प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय. त्यामुळे पंकजा मुंडे यांना तगडे आव्हान धनंजय मुंडे यांच्याकडून मिळणार असल्याचे म्हटलं जात आहेच.