उस्मानाबादमध्ये उमेदवाराचाच मतदानावर बहिष्कार

सोलापूर : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उपक्ष उमेदवार शंकर गायकवाड यांनीच मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने, गावकऱ्यांना पाठिंबा देत शंकर गायकवाड यांनीही बहिष्कार टाकला. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील काही भाग सोलापूर जिल्ह्यात मोडतो. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वाणेवाडी येथील ग्रामस्थांनी मुलभूत सुविधा मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकला. बार्शीतील वाणेवाडे येथील एकाही ग्रामस्थाने अद्याप मतदान […]

उस्मानाबादमध्ये उमेदवाराचाच मतदानावर बहिष्कार
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

सोलापूर : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उपक्ष उमेदवार शंकर गायकवाड यांनीच मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने, गावकऱ्यांना पाठिंबा देत शंकर गायकवाड यांनीही बहिष्कार टाकला.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील काही भाग सोलापूर जिल्ह्यात मोडतो. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वाणेवाडी येथील ग्रामस्थांनी मुलभूत सुविधा मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकला. बार्शीतील वाणेवाडे येथील एकाही ग्रामस्थाने अद्याप मतदान केले नाही.

दुसरीकडे, वाणेवाडीचे सुपुत्र असलेले शंकर गायकवाड हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने, शंकर गायकवाडांनीही गावकऱ्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे स्वत: उमेदवारानेही मतदान केलं नाही.

उस्मानाबादमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून राष्ट्रावादीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र राणाजगजीतसिंह पाटील हे रिंगणात आहेत, तर भाजप-शिवसेना युतीकडून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर मैदानात उतरलेत. ओमराजे निंबाळकर हे दिवंगत पवनराजे निंबाळकर यांचे सुपुत्र आहेत. याच मतदारसंघातून बार्शी तालुक्यातील वाणेवाडीचे शंकर गायकवाड हेही रिंगणात आहेत.