शिवसेना-भाजपच्या युतीवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची अखेर घोषणा झाली. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा झाली. युतीचा फॉर्म्युला आणि शिवसेनेच्या अटी याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच माहिती दिली. महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी शिवसेना 23 आणि भाजप 25 जागांवर लढणार आहे. या युतीवर पंतप्रधान […]

शिवसेना-भाजपच्या युतीवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
Follow us on

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची अखेर घोषणा झाली. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा झाली. युतीचा फॉर्म्युला आणि शिवसेनेच्या अटी याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच माहिती दिली. महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी शिवसेना 23 आणि भाजप 25 जागांवर लढणार आहे.

या युतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नातून साकारलेली ही युती यापुढेही महाराष्ट्राच्या कल्याणासाठी काम करत राहणार आहे. शिवसेनेसोबत आमची मैत्री ही राजकारणाच्या पलिकडची आहे. देशाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शिवसेनेमुळे एनडीए आणखी मजबूत होईल आणि महाराष्ट्रात ही युती एकमेव निवड असेल, अशी प्रतिक्रिया मोदींनी ट्विटरवर दिली.

युतीच्या घोषणेवेळी अमित शाह काय म्हणाले?

कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या मनातली भावना पूर्ण झाली असल्याचं सांगत अमित शाहांनी युतीचं स्वागत केलं. महाराष्ट्रातील 48 पैकी 45 जागा जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला. लोकसभेनंतर महाराष्ट्र विधानसभेसाठीही चार महिन्यात निवडणूक आहे. त्यामुळे जबाबदारी आणि जागाही निम्म्या वाटून घेणार असल्याचं अमित शाहांनी जाहीर केलं.

युतीच्या घोषणेची पत्रकार परिषद, संपूर्ण व्हिडीओ