Parbhani News: कारखान्यात शेतकऱ्यांना मारहाण, ठाकरेंच्या आमदारावर गंभीर आरोप; शिंदेंचे खासदार संतापले

आमरापूरमधील काही शेतकरी याच 100 रुपयांबाबत चर्चा करण्यासाठी कारखान्यावर गेले असता कारखान्याचे चेअरमन आणि परभणीचे आमदार राहुल पाटील हे शेतकऱ्यांच्या अंगावर धावून गेले.

Parbhani News: कारखान्यात शेतकऱ्यांना मारहाण, ठाकरेंच्या आमदारावर गंभीर आरोप; शिंदेंचे खासदार संतापले
| Updated on: Nov 10, 2026 | 8:26 PM

ज्ञानेश्वर उंडाळ, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी: 

UBT MLA Rahul Patil Attack On Farmer:  परभणीमधील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे.  आमदार राहुल पाटील असलेल्या चेअरमन असलेल्या लक्ष्मी नरसिंह साखर कारखान्यात मागील वर्षीच्या तुटलेल्या उसाचे 100 रुपये मागण्यासाठी काही शेतकरी गेले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दमदाटी केली तसेच मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या घटनेनंतर ऊस उत्पादक संघर्ष शेतकरी समिती आक्रमक झाली असुन राहुल पाटील यांच्या विरोधात दोन हात करण्याचा आणि आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

Loading...

संघर्ष समितीचा इशारा

लक्ष्मी नरसिंह साखर कारखान्याने मागीलवर्षी शेतकऱ्यांना 100 रुपये देण्याबाबत आश्वासन दिले होते. आमरापूरमधील काही शेतकरी याच 100 रुपयांबाबत चर्चा करण्यासाठी कारखान्यावर गेले असता कारखान्याचे चेअरमन आणि परभणीचे आमदार राहुल पाटील हे शेतकऱ्यांच्या अंगावर धावून गेले, त्यांनी शेतकऱ्यांना दमदाटीही केली. आमदार राहुल पाटील यांच्या या कृत्याचा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने धिक्कार करतो, असं संघर्ष समितीच्या नेत्यांनी म्हटले आहे.

तसेचन राहुल पाटील हे आमदार आहेत, त्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे. त्यांना शेतकऱ्याच्या अंगावर धावून जाणे हे कृत्य शोभणारे नाही. त्यांनी इथून पुढे असं धैर्य करु नये. मागच्या वर्षाचे सव्वा दोनशे रुपये आपल्या कारखान्याकडे बाकी आहेत. तसेच चालू वर्षाचेही गाळपाचे पैसे देणे भाग आहे. ऊसाच्या आणि साखरेच्या भावाप्रमाणे अंतीम दरही द्यायला लागेल. आपण अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या अंगावर धावून जात असाल तर शेतकरीही दोन हात करतील, असा इशारा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

खासदार संजय जाधव संतापले!

राहुल पाटील यांनी शेतकऱ्याला मारहाण केली आहे. त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केले. शेतकरी जर तुमच्याकडे यातना घेऊन आला असेल तर तुम्ही मदत केली पाहिजे. निदान समजून घेण्याची तरी मानसिकता ठेवली पाहिजे. तुम्ही पुढारी आहात. पुढाऱ्याने सामंजस्याने वागले पाहिजे. आज शेतकरी अडचणीत आहे. त्यांच्याकडे तुमचे लेखी पत्र आहे, दुसऱ्या कारखान्याच्या बरोबरीने तुम्हाला मी पैसे देईन असा त्यात उल्लेख आहे. निदान शेतकऱ्याशी तरी बेईमानी करु नका, अशा शब्दात खासदार संजय जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us