
पिंपरी : पिंपरी चिंचवड मनपातही निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रभाग रचना जाहीर झाली. बहुतेक सर्व राजकीय पक्षांचे (Political parties) उमेदवार आणि इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. तिकीट मिळविण्यासाठी राजकीय पक्षाच्या नेत्यांशी जवळीकता साधणे सुरू आहे. परिसीमनामुळं काही मतदारसंघात (constituencies) फेरबदल झाले. सोयीच्या मतदारसंघात काहींना लक्ष घालायचा सुरुवात केली. मतदारांशी जवळीकता साधण्याचं काम सुरू झालंय. मतदारांच्या (electorates) घरी भेटी-गोटी सुरू झाल्यात. विभागात जाऊन समस्या जाणून घेतल्या जात आहेत. वॉर्डात फलकबाजी सुरू झाली आहे. यावरून कोण-कोण उभेच्छुक आहेत, याची माहिती मिळते.
वॉर्ड 14 अ
| राजकीय पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
|---|---|---|
| भाजप | ||
| काँग्रेस | ||
| राष्ट्रवादी | ||
| शिवसेना | ||
| मनसे | ||
| इतर |
परिसीमनामुळं वॉर्ड रचना बदलली. दोन राष्ट्रवादीचे आणि दोन शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. वॉर्ड 14 अ मधून राष्ट्रवादीचे रमजान शेख जावेद निवडून आले. वॉर्ड 14 ब मधून शिवसेनेच्या मीनल विशाल यादव विजयी झाल्या होत्या. वॉर्ड 14 क मधून राष्ट्रवादीच्या वैशाली जालिंदर काळभोर विजयी झाल्या. तर वॉर्ड 14 ड मधून शिवसेनेचे प्रमोद प्रभाकर कुटे निवडून आले. यावेळी वॉर्ड 14 मधून अ अनुसूचित जाती, ब मधून सर्वसाधारण महिला व क मधून सर्वसाधारण राखीव ठेवण्यात आली आहे. तीनच उमेदवार निवडून यावं लागणार आहे. वॉर्ड 14 लोकसंख्या 35 हजार 711 आहे. अनुसूचित जातीची 5 हजार 713 तर अनुसूचित जमातीची 589 आहे.
वॉर्ड 14 ब
| पक्षाचे नाव | उमेदवार | विजयी उमेदवार |
|---|---|---|
| भाजप | ||
| काँग्रेस | ||
| राष्ट्रवादी | ||
| शिवसेना | ||
| मनसे | ||
| इतर |
या वॉर्डाची व्याप्ती यमुनानगर, कृष्णानगर भाग, त्रिवेणीनगर इत्यादी आहे. उत्तर – तळवडे रोड व नानाश्री वेडवालेपासून पूर्वेस रस्त्याने प्रजनन, प्रबोधन बोधनी इंग्रजी मीडियम शाळेपर्यंत. पूर्व – तळवडे चिखली शिवेपासून दक्षिणेस धनगर बाबा मंदिराच्या रस्त्याने त्रिवेणीनगर रस्ता ओलांडून व शिवरकर चौक ओलांडून कुदळवाडी इंडस्ट्रीयल रस्त्याच्या आनंदघन वृद्धाश्रापर्यंत व त्याच रस्त्याने पूर्वेस ओम साई चौक, चिखली आकुर्डी रस्त्यापर्यंत व त्याच रस्त्याने दक्षिणेस कस्तुरी मार्केट बस स्टॉप व वरद चिल्डेन हॉस्पिटलपर्यंत. दक्षिण – कस्तुरी मार्केट बसस्टॉप व वरद चिल्डेन हॉस्पिटलपासून पश्चिमेस पाण्याच्या टाकीच्या लगतच्या मोकळ्या जागेपर्यंत त्यालगतच्या रस्त्याने दक्षिणेस टीसीआय फाईट लगतच्या रस्त्याने टाटा मोटर्स (टेल्को) रस्त्यापर्यंत व त्याच रस्त्याने पश्चिमेस दुर्गा चौकापर्यंत व चौकातून पश्चिमेस माता रमाबाई भीमराव आंबेडकर रस्त्याने एलआयसी कॉर्नरपर्यंत. पश्चिम – एलआयसी कॉर्नर व बजाज ऑटो कंपनी जवळील यमुनानगर रस्त्याने विश्वेश्वर सहकारी बँकेच्या लगतच्या गणेश मंदिर व व्यंकटेशन सोसायटी लगतच्या रस्त्याने कै. जानकीबाई आंबेडकर रस्त्याच्या हेडगेवार चौकापर्यंत त्याच रस्त्याने पश्चिमेस मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी एच. पी. साने रस्त्यापर्यंत व त्याच रस्त्याने उत्तरेस एस. पी. एम. इंग्लिश शाळेजवळील अंकुश बोऱ्हाडे रस्त्यापर्यंत व त्याच रस्त्याने पूर्वेस स्पाईन रस्ता ओलांडून दलवाई नगर रस्त्यापर्यंत व त्याच रस्त्याने स्वामी विवेकानंद शाळेलगतच्या अंतर्गत उत्तरेस त्रिवेणीनगर रस्त्यापर्यंत व त्याच रस्त्याने पूर्वेस त्रिवेणीनगर चौकापर्यंत व त्याच चौकातून तळवडे रस्त्याने उत्तरेस प्रजनन प्रबोधन बोधनी इंग्रजी मीडियम शाळा तळवडे रस्त्याच्या नानाश्री वडेवालेपर्यंत.
वॉर्ड 14 क
| पक्षाचे नाव | उमेदवार | विजयी उमेदवार |
|---|---|---|
| भाजप | ||
| शिवसेना | ||
| राष्ट्रवादी | ||
| काँग्रेस | ||
| मनसे | ||
| इतर |