PM Narendra Modi : ‘जितकं लढायच होतं, तेवढे लढलो, आता….’, पंतप्रधान मोदींचे महत्त्वाचे शब्द

PM Narendra Modi : आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महत्त्वाची वक्तव्य केली आहेत. अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी ते मीडियाशी बोलले.

PM Narendra Modi : जितकं लढायच होतं, तेवढे लढलो, आता...., पंतप्रधान मोदींचे महत्त्वाचे शब्द
pm narendra modi
| Updated on: Jul 22, 2024 | 11:30 AM

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सर्व खासदार, राजकीय पक्षांना महत्त्वाच आवाहन केलं. “विकसित भारताच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मजबूत पाया रचणार बजेट घेऊन उद्या देशासमोर येणार आहोत. प्रत्येक देशवासियासाठी ही गर्वाची बाब आहे की, भारत मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशात वेगाने पुढे जाणारा देश आहे. मागच्या तीन वर्षात 8 टक्के वाढीसह आम्ही पुढे जातोय. आज भारतात सकारात्मकता, गुंतवणूक आणि परफॉर्मन्स एकप्रकारे अपॉर्च्युनिटी पीकवर आहे. हा भारताच्या विकास यात्रेचा एक महत्त्वाचा टप्पा आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“मित्रांनो, मी देशातील सर्व खासदारांना कुठल्याही पक्षाचे का असेनात, मी त्यांना आग्रहाने सांगू इच्छितो की, जानेवारीपासून आपल्याकडे जितकं सामर्थ्य होतं. ते सामर्थ्य घेऊन, जितकी लढाई लढायची होती तेवढे लढलो. जनतेला जे सांगयाच होतं ते सांगितलं. कोणी मार्ग दाखवला, कोणी दिशाभूल केली. पण तो टप्पा संपलाय. देशाने निर्णय दिला आहे. आता निवडून आलेल्या सर्व खासदाराच कर्तव्य आहे. सर्व पक्षांची जबाबदारी आहे, आपल्याला पक्षासाठी जितकं लढायच होतं, तेवढे लढलो, आता येणाऱ्या पाच वर्षांसाठी आपल्याला देशासाठी लढायचं आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


‘त्या नंतर तुम्ही मैदानात जा, जो खेळ खेळायचाय तो खेळा’

“सर्व राजकीय पक्षांनी येणारी चार-साडे चारवर्ष पक्षाच्या पुढे जाऊन देशाला समर्पित होऊन संसदेचा उपयोग करु. जानेवारी 2029 निवडणूक वर्ष असेल, त्या नंतर तुम्ही मैदानात जा. जो खेळ खेळायचाय तो खेळा. पण तो पर्यंत फक्त देशातील गरीब, शेतकरी, युवा, महिला त्यांच्या समार्थ्यासाठी, त्यांना सबळ करण्यासाठी जनभागीदारी, जनआंदोलन उभं करु. 2047 च विकसित भारताच स्वप्न साकार करण्यासाठी पूर्ण ताकद लावू” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.