PM Narendra Modi : ‘देशाच्या पंतप्रधानांचा गळा घोटण्याचा…’, अधिवेशन सुरु होण्याआधी पंतप्रधान मोदींच मोठं वक्तव्य

PM Narendra Modi : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी एक मोठ वक्तव्य केलं. "देशवासियांनी आम्हाला देशासाठी पाठवलय. पक्षासाठी पाठवलेलं नाही. हे सभागृह पक्षासाठी नाही, देशासाठी आहे. 140 कोटी देशवासियांसाठी हे सभागृह आहे" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

PM Narendra Modi : देशाच्या पंतप्रधानांचा गळा घोटण्याचा..., अधिवेशन सुरु होण्याआधी पंतप्रधान मोदींच मोठं वक्तव्य
narendra modi
| Updated on: Jul 22, 2024 | 11:21 AM

“मी हे दु:खाने बोलतोय, 2014 नंतर काही खासदार पाच वर्षांसाठी आले, काही १० वर्षांसाठी आले. पण असे बरेच खासदार होते, ज्यांना आपल्या मतदारसंघासाठी बोलण्याची संधी मिळाली नाही. आपल्या विचारांना संसेदत समृद्ध करण्याची संधी मिळाली नाही. कारण काही पक्षांच्या नकारात्मक राजकारणामुळे देशच्या संसेदचा महत्त्वपूर्ण वेळ, एक प्रकारे आपलं राजकीय अपयश झाकण्यासाठी दुरुपयोग केला” अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

“मी सर्व पक्षांना आग्रह करतो की, कमीत कमी जे खासदार पहिल्यांदा संसदेत निवडून आलेत, त्यांना संधी द्या, त्यांना त्यांचे विचार व्यक्त करु द्या लोकांना पुढेच यायची संधी द्या” असं अपील पंतप्रधान मोदी यांनी केलं. तुम्ही पाहिलं असेल नवीन संसद स्थापन झाल्यानंतर पहिलं सत्र होतं. 140 कोटी देशवासियांनी बहुमताने ज्या सरकारला सेवा करण्याचा आदेश दिला. त्याच आवाजाला चिरडण्याचा, अलोकतांत्रिक प्रयत्न झाला. अडीच तास देशाच्या पंतप्रधानांचा गळा घोटण्याचा, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. लोकशाही व्यवस्थेत अशा गोष्टींना स्थान नाही. ज्यांनी हे केलं, त्यांना याचा पश्चाताही नाहीय. मनात वेदना सुद्धा नाहीयत. देशवासियांनी आम्हाला देशासाठी पाठवलय. पक्षासाठी पाठवलेलं नाही. हे सभागृह पक्षासाठी नाही, देशासाठी आहे. 140 कोटी देशवासियांसाठी हे सभागृह आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


‘नकारात्मक विचार वाईट असतात’

“सर्व खासदार पूर्ण तयारीनिशी चर्चेला समृद्ध करतील. कितीही विरुद्ध विचार असतील, विरुद्ध विचार वाईट नसतात, नकारात्मक विचार वाईट असतात. देशाला नकारात्मकतेची आवश्यकता नाही. देशाला एका विचारधारेची, प्रगती विकास विचारधारेची, देशाला नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या विचारधारेची आवश्यकता आहे. लोकशाहीच्या या मंदिराचा सामन्यात माणसाच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सकारात्कम उपयोग करु” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.