‘या’ ट्वीटला रिट्वीट करत पंतप्रधान मोदींकडून जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा

नवीन वर्षाच्या सुरुवातीपूर्वीच येणारं वर्ष हे देशासाठी सर्वोत्तम असेल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत वर्ष 2020 साठी देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

या ट्वीटला रिट्वीट करत पंतप्रधान मोदींकडून जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा
| Updated on: Dec 31, 2019 | 11:32 PM

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या सुरुवातीपूर्वीच येणारं वर्ष हे देशासाठी सर्वोत्तम असेल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत वर्ष 2020 साठी देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या. देशातील जनतेच्या आनंदी जीवनासाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. हे येणारं वर्ष लोकांना सशक्त आणि सक्षम बनवेल, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

पंतप्रधानांनी NaMo 2.0 च्या ट्विटर हँडलवरील ट्वीटला रिट्वीट करत पोस्ट केली. NaMo 2.0 च्या ट्वीटमध्ये मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या सर्व कामांचा व्हिडीओ तयार करुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये मोदी सरकारच्या अनेक यशस्वी कामं जसे करतारपूर कॉरिडोर उद्घाटन, देशातील पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन आणि आर्टिकल 370 मध्ये बदल या सर्वांचा समावेश आहे.

याशिवाय, पंतप्रधान मोदींनी एका व्यक्तीच्या ट्वीटला रिट्वीट करत भारतीय तरुणांचं कौतुक केलं आहे. “तरुणांचा विकास व्हावा, यासाठी देशात योग्य वातावरण निर्मिती करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत”, असं पंतप्रधानांनी लिहिलं.

PM Narendra Modi tweet to wish a Happy New year