संघाच्या होमग्राऊंडवर आंबेडकर-ओवेसींचा एल्गार

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात उद्या (13 डिसेंबर) एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर एका मंचावरुन हुंकार भरणार आहेत. लोकसभेच्या दृष्टीने ही तयारी असली, तरी भाजपच्या गडात हे दोन्ही नेते काय हुंकार भरतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. नागपूर संघाचं मुख्यालय आणि भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात […]

संघाच्या होमग्राऊंडवर आंबेडकर-ओवेसींचा एल्गार
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात उद्या (13 डिसेंबर) एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर एका मंचावरुन हुंकार भरणार आहेत. लोकसभेच्या दृष्टीने ही तयारी असली, तरी भाजपच्या गडात हे दोन्ही नेते काय हुंकार भरतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

नागपूर संघाचं मुख्यालय आणि भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात नव्याने झालेल्या वंचित आघाडीने आगाज  करण्याचं ठरवलं. संघाच्या होमग्राऊंडवरुनच आम्ही भाजपला ललकारणार असल्याचं एमआयएम नेते सांगतात.

नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. शहरात पाच आमदार भाजपचे आहेत. खासदार भाजपचे आहे. मात्र या ठिकाणी जे दोन नेते एका मंचावर येत आहेत, ते वंचित आघाडी निर्माण केल्याचं सांगत असल्याने यात सगळ्याच जाती-धर्माचा समावेश होतो. महत्वाचं म्हणजे, या ठिकाणी दलित आणि मागासवर्गीय लोकांची संख्या मोठी आहे, तर मुस्लिम सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आता हे दोन नेते एकत्रित आले तर याचा फायदा होऊन भाजप आणि काँग्रेसला टक्कर देणार असल्याचं भारिप-बहुजन महासंघाचे महासचिव सांगतात.

नागपुरात आणि विदर्भातही मुस्लिम आणि दलित सोबतच ओबीसींची संख्याही मोठी आहे. मात्र या नेत्यांच्या आघाडीला जनता किती पसंती देते आणि ती मतांमध्ये किती बदलते, हे सुद्धा महत्वाचं राहणार आहे.